PM Narendra Modi  : "निश्चितपणे हे युग युद्धाचं नाही, पण हे युग दहशतवादाचंही नाही. दहशतवाद सहन केला जाणार नाही. पाकिस्तानी लष्कर आणि सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी देत आहेत, ते पाहाता  एकेदिवशी दहशतवाद पाकिस्तानला संपवेन. पाकिस्तानला वाचायचं असेल तर त्यांनी दहशतवादाचं इन्फ्रास्ट्रक्चर संपवायला हवं", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक शस्त्रसंधीनंतर पीएम मोदींनी (Narendra Modi) देशाला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.

दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाणार - नरेंद्र मोदी 

 नरेंद्र मोदी म्हणाले, भारतावर जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाणार हे ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झालं.यापुढे न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही. त्या धमकीच्या आडून दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना सोडणार नाही. दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहणार नाही. दोघांवरही कारवाई होणार..

युद्धाच्या मैदानावर आपण नेहमी पाकिस्तानला पराभूत केलंय - नरेंद्र मोदी 

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, भारताचे तिन्ही सैन्य दलं सातत्याने अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधात भारताचं धोरण आहे. भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. ज्या ठिकाणाहून दहशतवादी तयार होतात, तिथे हल्ला केला जाईल.  युद्धाच्या मैदानावर आपण नेहमी पाकिस्तानला पराभूत केलंय. वाळवंट आणि डोंगराळ भागातही आपण क्षमता दाखवली आहे. या ऑपरेशन दरम्यान, मेड इन इंडिया शस्त्र कामी आले आहेत. दहशतवादाविरोधात एकजूट राहाणे हीच आपली शक्ती आहे, असंही मोदी म्हणाले. 

ऑपरेशन सिंदूरने एक नवी सीमारेषा आखलीय - नरेंद्र मोदी 

भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्या अलर्ट आहेत. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांविरुद्ध भारताची नीती आहे. ऑपरेशन सिंदूरने एक नवी सीमारेषा आखलीय. जर भारतावर हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटी-शर्तींनीच उत्तर देणार, असंही मोदींनी स्पष्ट केलंय..

इतर महत्त्वाच्या बातम्या 

India Pakistan Ceasefire News LIVE: आमच्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरने धडा शिकवला : मोदी