PM Narendra Modi on National Space Day 2026 : 'आणखी मोठी स्वप्ने पाहणे, अधिक नवनवीन प्रयोग करणे आणि प्रगतीची नवी क्षितिजे गाठणे, यांसाठी शुभेच्छा...' असंम्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्य (National Space Day) देशातील देशवासियांना आणि शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक करत 'ही एका नवीन कालचक्राची सुरुवात' असल्याचेम्हटलंआहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या 'जनरेशन झेन'ची (Gen Z) देखील प्रशंसा केली. तर राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत पंतप्रधानांचीखास शुभेच्छा दिल्या आहेत. (PM Narendra Modi on National Space Day 2026)
PM Narendra Modi : देशाचे अंतराळ क्षेत्र आता जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र
भारतात दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो. 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले होते. भारत चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश बनला होता. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मिशनच्या विक्रम लँडरने (Vikram Lander) चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. अशातच आजच्या (23 ऑगस्ट 2026) या ऐतिहासिक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना आणि शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या वाढत्या जागतिक भूमिकेची प्रशंसा केली आणि सांगितले की देशाचे अंतराळ क्षेत्र आता जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहे. तसेच पंतप्रधानमोदींनीएक व्हिडिओ शेअर करत यापर्वाला एका नव्या युगाची सुरुवात म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या 'जनरेशन झेन'ची (Gen Z) देखील प्रशंसा केली. ते म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी अंतराळ क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आज भारत सेमी क्रायोजेनिक इंजिन अँड इलेक्ट्रिक प्रोपल्शन यासारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करत असल्याचेहीतेम्हणाले.
Prime Minister Modi : भारताची जागतिक स्तरावर अंतराळ उपस्थिती वाढत आहे
आपल्या भाषणांचा एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी अयोध्येत म्हटले होते की ही बदलाच्या नव्या युगाची सुरुवात आहे. या नव्या युगात भारत जागतिक प्रणालीमध्ये आपली अंतराळ उपस्थिती सातत्याने वाढवत आहे आणि त्याचा प्रभाव देशाच्या अंतराळ कार्यक्रमात स्पष्टपणे दिसून येत आहे. पंतप्रधानमोदी म्हणाले की, 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा देशाने सामूहिक संकल्प केला आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी अंतराळ क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
PM Narendra Modi: Gen -Z अभियंते आणि शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञान क्षेत्र विकसित करतायत
देशातील तरुणाईची प्रशंसा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जनरेशन झेडचे अभियंते, डिझाइनर, कोडर आणि शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत. ते प्रणोदन प्रणाली (प्रोपल्शन सिस्टीम), संमिश्र साहित्य (कंपोझिट मटेरियल्स), रॉकेटचे टप्पे (रॉकेट स्टेजेस) आणि उपग्रह मंच (सॅटेलाइट प्लॅटफॉर्म) यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. ते म्हणाले की, भारतातील तरुण अशा क्षेत्रांमध्ये काम करत आहेत, ज्यांची अलीकडेपर्यंत कल्पनाही करता येत नव्हती.
National Space Day 2026 :खाजगी अंतराळ क्षेत्र गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र
पंतप्रधानांनी देशाच्या खाजगी अंतराळ क्षेत्राची प्रशंसाही केली. ते म्हणाले की, भारतातील खाजगी अंतराळ क्षेत्रातील प्रतिभा जागतिक स्तरावर आपली छाप पाडत आहे. आज देशाचे अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) देशाच्या शास्त्रज्ञांच्या पुढील पिढीला प्रेरणा देत आहे. ते म्हणाले की, इस्रोचे यश पाहून अनेक मुलांना वाटते की, तेही मोठे होऊन शास्त्रज्ञ बनतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेची प्रशंसा करताना ते म्हणाले की, चांद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झाल्याने अंतराळ क्षेत्रात भारताचे मजबूत स्थान जगाला दिसून आले आहे. अंतराळ क्षेत्रात भारताला एक स्पष्ट नेता बनवण्याच्या मोदींच्या दूरदृष्टीच्या यशाचा हा पुरावा आहे, असे ते म्हणाले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले, "आकाशाला मर्यादा नाही." त्यांनी तरुण शास्त्रज्ञ, अभियंते आणि उद्योजकांना सलाम केला आणि म्हणाले की त्यांची दूरदृष्टी, नाविन्यता आणि अथक प्रयत्न भारताच्या क्षमतांच्या सीमा विस्तारत आहेत.
इतरमहत्वाच्याबातम्या
