BRICS संमेलनातही पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानचे वाभाडे
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2016 03:48 PM (IST)
पणजी: गोव्यात सुरु असलेल्या पाच देशांच्या ब्रिक्स संमेलानात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकचे वाभाडे काढले. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता, दहशतवादाचा जन्मदाता आणि त्याला पोसणारा देश एकच असून तो भारताचा शेजारी असल्याचं म्हटलं. तसेच दहशतवाद हा जागातील सर्व अर्थव्यवस्था आणि विकासाला सर्वात मोठा धोका असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी नमुद करुन, दहशतवाद विरोधातील लढ्यात ब्रिक्स देशांनी एकत्रित येण्याचं आवाहन केलं. पाकिस्तानचे वाभाडे काढताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,''हा देश केवळ दहशतवादालाच पोसतो असं नाही, तर यासाठीची पोषक मानसिकतेलाही प्रोत्साहन देतो. या मानसिकतेचा संबंध दहशतवाद आणि राजयकीय फायद्याशी जोडलेला आहे.'' शिवाय, याचा फटका भारत किंवा दक्षिण अशियालाच फटका बसला आहे असे नाही, तर मध्यपूर्व पश्चिम अशिया आणि युरोपसाठीही धोका असल्याचंही पंतप्रधानांनी यानिमित्त बोलताना सांगितलं.