Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीतील (Uttarakhand) बोगद्यात अडकलेल्या 41 कर्मचाऱ्यांची 17 दिवसानंतर सुटका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) अभिनंदन केलं आहे. कर्मचारी हे आता आपल्या प्रियजणांना भेटणार आहेत, बचाव कार्यात सामिल असलेल्या सर्वांच्या जिद्दीला आणि धैर्याला सलाम करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 


उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यारा बोगद्यात 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांची सुटका करण्यात आली आहे. सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांपैकी विजय होरी यांना प्रथम बाहेर काढण्यात आले. यानंतर गणपती होरी यांना बाहेर काढण्यात आले. या कामगारांसाठी रॅट मायनिंग करणारे देवदूत म्हणून आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सर्व मजुरांचे अभिनंदन केलं आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्मचाऱ्यांच्या जिद्दीला सलाम केलं आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीम वर्कचे एक अद्भुत उदाहरण समोर ठेवले आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 


काय म्हणाले नरेंद्र मोदी? (PM Modi Tweet On Uttarkashi Tunnel Rescue) 


उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावुक करत आहे.
 
बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आणि चांगले आरोग्य इच्छितो.


प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजणांना भेटणार आहेत ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कौतुक करता येणार नाही.


या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांच्या कार्याला मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि जिद्दीने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण समोर ठेवले आहे.


 






ही बातमी वाचा: