नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं जगभरात तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, भारत केवळ स्वतःच्या नव्हे तर जगाच्या ऊर्जा गरजांचीही काळजी घेऊ शकतो. याचवेळी त्यांनी काँग्रेसवर अफवा पसरवल्याचा आरोप करत तीव्र टीकाही केली.
Energy Supply India : भारत ऊर्जा क्षेत्रात सक्षम
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "पूर्वी जगात कुठेही युद्ध किंवा संकट निर्माण झालं की त्याचा परिणाम पुरवठ्यावर होत असायचा आणि आपले शेतकरी संकटात सापडायचे. कधी खतांच्या किमती वाढत, तर कधी डिझेल आणि इंधन महाग होत असे. या स्थितीला काँग्रेस कारणीभूत होतं. काँग्रेस सरकारच्या काळात भारत अनेक बाबतीत परदेशांवर अवलंबून होता, त्यामुळे शेतीचा खर्च वाढत असे. मात्र गेल्या दशकात भाजप-एनडीए सरकारनं आत्मनिर्भरतेवर भर देत ऊर्जा क्षेत्रात मोठं काम केलं."
Refining Capacity India: रिफायनरी क्षमता वाढवली
मोदी म्हणाले की, "गेल्या दशकभरात भाजप सरकारनं देशातील रिफायनरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांच्या विकासावर मोठ्या प्रमाणात काम केलं. यामुळं आज भारत ऊर्जा उत्पादन आणि पुरवठ्याच्या बाबतीत मजबूत देशांपैकी एक बनला आहे. भारत स्वतःच्या गरजा भागवण्यासोबतच जागतिक ऊर्जा बाजारातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो."
Congress Allegation: काँग्रेसवर अफवा पसरवल्याचा आरोप
युद्धाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशात अफवा आणि दिशाभूल करणारा प्रचार करत असल्याचा आरोप मोदींनी केला. त्यांनी काँग्रेस नेत्यांना उद्देशून म्हटलं की, देश संकटात असतानाही काँग्रेस राजकारण करत आहे.
Nehru Reference: नेहरूंच्या भाषणाचा उल्लेख
मोदी म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकदा लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात म्हटलं होतं की उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये युद्ध सुरू असल्याने देशात महागाई वाढली आहे. ते दोन्ही देश कुठे आहेत आणि त्याचा देशातल्या महागाईशी काय संबंध? आज काँग्रेसचे नेतेही त्याच पद्धतीनं जागतिक संकटांबाबत देशाची दिशाभूल करत आहेत. जागतिक संकटाचा परिणाम काय असतो हे जग पाहत आहे.
ही बातमी वाचा:
