Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर आज चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाषण केले. भाषणाशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्ल्यू जॅकेट अन् काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं मफलर याची सध्या संसदेत आणि सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. खरगे यांच्या मफलरची किंमत तब्बल 56 हजार रुपये इतकी असल्याचं समजतेय. भाजप नेत्यांनी खरगेंच्या या मफलरवर टीकास्त्र सोडलेय. त्याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी खरगे यांच्या मफलवर ट्वीट करत टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत घातलेला मफलर वो लूई वीटॉन (Louis Vuitton) या कंपनीचा असून याची किंमत 56 हजार रुपये इतकी आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकच्या बॉटलपासून तयार केलेले जॅकेट परिधान करुन संसदेत हजेरी लावली तर दुसरीकडे खरगेंनी 56 हजारांचा मफलर परिधान केला, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन दिवसांपूर्वी प्लास्टिकचं जॅकेट मिळालं होतं. तेच जॅकेट आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात परिधान करुन आले होते. त्यांच्या या जॅकेटची जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांचं अनेकांनी कौतुक केले. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी परिधान केलेल्या मफलरचीही जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपनं यावरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्वीटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये एक फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्या फोटोत मोदींनी परिधान केलेले जॅकेट हे प्लास्टिकच्या बॉटलपासून तयार केले आहे. त्यांना ते दोन दिवसांपूर्वी गिफ्ट मिळालं होतं. तर दुसऱ्या फोटोमध्ये खरगे दिसत आहे. शहजाद पूनावाला यांनी खरगे यांनी परिधान केलेल्या जॅकेटची किंमत सांगत निशाणा साधलाय. या मफलरची किंमत 56332 रुपये असल्याचं शहजाद यांनी सांगितलेय. यावरुन त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. नेटकऱ्यांनाही त्यांच्यावर ताशोरे ओढले आहेत. त्यामागील कारणही असेच आहे.. कारण सभागृहात खरगे गरीबीवर बोलत होते, अन् त्यांनी 56 हजारांचं मफलर परिधान केला होता. यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उडत आहे.
पाहा कोण काय म्हणाले?
आणखी वाचा :