Independence Day 2026 PM Modi Speech : देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिनाचाउत्साहबघायलामिळतोआहे. अशातचदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरुन प्रथेप्रमाणे देशवासियांना उद्देशून भाषण केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विकसितभारत, आत्मनिर्भर भारतासह देशाच्या भविष्यातील वाटचालीबाबत भाष्य केले. 2047 साली देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा आपण विकसित भारताचे ध्येय पूर्ण करुन राहू. असा निर्धार पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी व्यक्त केला. सोबतच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज, मी राष्ट्रासमोर 'शक्तीच्या सात प्रवाहांचे' आवाहन करत आहे. येत्या 5-7 वर्षांत, या 'सात प्रवाहांच्या' शक्तीने, जे गेल्या 5-7 दशकांत घडले नाही, आम्ही देशाला नवीन उंची, गती आणि नवीन ध्येये साध्य करण्याचे सामर्थ्य देऊ. यासोबतच, राष्ट्र उभारणीत देशातील युवकांच्या क्षमतेचाही पुरेपूर उपयोग केला जाईल, त्यांच्या सामर्थ्याची भर घातली जाईल." असेआवाहन पंतप्रधानांनीदेशवासियांनाकेलाआहे.
Manufacturing Sector: 'सप्त धारां'पैकी पहिली 'शक्ती' म्हणजे उत्पादन क्षेत्र
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज मला तुम्हाला 'सप्त सिंधू'ची आठवण करून द्यायची आहे. आता 'विकसित भारत' घडवण्यासाठी आपल्याला एका नवीन ऊर्जेची किंवा प्रवाहाची गरज आहे. या 'सप्त धारां'पैकी पहिली 'शक्ती' म्हणजे उत्पादन क्षेत्र (मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर). यासाठी आपल्याला तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल - खर्च (cost), गुणवत्ता (quality) आणि प्रमाण/व्याप्ती (scale). गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, हेच आपले 'ब्रँड मूल्य' असेल.
Food processing 'सप्तधारां'पैकी दुसरी 'शक्ती' म्हणजे अन्न प्रक्रिया
दुसरी 'शक्ती' म्हणजे अन्न प्रक्रिया (food processing). नवीन मुक्त व्यापार करारांमुळे (FTAs) आता आपल्याला जागतिक बाजारपेठांमध्ये अधिक चांगली उपलब्धता मिळाली आहे.
Technology and Innovation 'सप्तधारां'पैकी तिसरी 'शक्ती' म्हणजे तंत्रज्ञान, नावीन्य आणि डिजिटल तंत्रज्ञान.
'सप्तधारां'पैकी सातवी शक्ती म्हणजे भारताची तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, डिजिटल आणि दळणवळण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
Connectivity: 'सप्तधारां'पैकी चौथी 'शक्ती' म्हणजे कनेक्टिव्हिटी
पंतप्रधान मोदी पुढेबोलतानाम्हणाले, 'सप्तधारां'पैकी चौथी 'शक्ती' म्हणजे 'गती-शक्ती' - म्हणजेच देशांतर्गत अखंड आणि वेगवान संपर्क-व्यवस्था (कनेक्टिव्हिटी). आपल्याला अखंड उच्च-वेगवान रेल्वे संपर्क, आधुनिक महामार्ग, अंतर्गत जलमार्ग, विमानतळ, बहु-विध लॉजिस्टिक्स हब आणि बंदरे यांची आवश्यकता आहे. आपल्याला बंदरांवर आधारित विकासाच्या दिशेने काम करायचे आहे.
Defense Sector: पाचवी 'शक्ती' म्हणजे संरक्षण क्षेत्रातील उत्पादन,
पाचवी 'शक्ती' म्हणजे संरक्षण क्षेत्रातील उत्पादन, यात आपण स्वावलंबी झाले पाहिजे आणि जागतिक पुरवठादार बनण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे."
Green Economy: 'सप्तधारां' पैकी सहावी शक्ती म्हणजे 'हरित अर्थव्यवस्था'
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशवासियांनाआवाहनकरताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'सप्तधारां' पैकी सहावी शक्ती म्हणजे 'हरित अर्थव्यवस्था' (Green Economy) होय. आपण अक्षय ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, हरित साठवणूक आणि उत्पादन या क्षेत्रांत काम केले पाहिजे. तसेच, 'निळ्या अर्थव्यवस्थे'च्या (Blue Economy) क्षेत्रातही भारतासमोर मोठी संधी आहे."
'Soft power': 'सप्तधारां'पैकी सातवी शक्ती म्हणजे भारताची 'सॉफ्ट पॉवर'
'सप्तधारां'पैकी सातवी शक्ती म्हणजे भारताची 'सॉफ्ट पॉवर' (मृदू शक्ती) होय. आज योगामुळे जग भारताशी जोडले गेले आहे. आपला आयुर्वेद, सर्वांगीण आरोग्यसेवा, हस्तकला, संस्कृती, चित्रपट, ॲनिमेशन, गेमिंग आणि डिजिटल आशय (कंटेंट) या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. जग भारताच्या 'WAVES' परिषदेची दखल घेत आहे आणि त्याकडे उत्सुकतेने पाहत आहे. आपल्याकडे १०० हून अधिक राष्ट्रीय उद्याने आहेत. या 'सॉफ्ट पॉवर'च्या बळावर परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याची संधी आपल्याकडे आहे.
PM Modi on AI: येत्या वर्षात 1 कोटी तरुणांना एआय (AI) कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प
पंतप्रधान मोदी म्हणाले, "माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा मी विकसित भारताबद्दल बोलतो, जेव्हा मी देशाला वेगाने पुढे नेण्याबद्दल बोलतो - तेव्हा याचा सर्वाधिक फायदा कोणाला होतो? या सर्व प्रयत्नांमागे सर्वात मोठी प्रेरक शक्ती कोण आहे? जर कोणती प्रेरक शक्ती असेल, तर ती माझ्या देशातील तरुण पिढी आहे. ही माझ्या देशातील तरुणांची शक्ती आहे. विकसित भारताच्या प्रवासात तरुणांची मोठी भूमिका आहे. आज, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून, मला देशातील तरुणांसाठी एक घोषणा करायची आहे: आम्ही येत्या वर्षात १ कोटी तरुणांना एआय (AI) कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे, जेणेकरून आपल्या देशातील तरुणांमध्ये एआयच्या क्षेत्रातही जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण होईल."
PM Modi on Gen-Z : विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आम्ही मोफत ऑनलाइन कोचिंगचे जाळे उभारणार आहोत. आजकाल पालकांना वाटते की, जर त्यांचे मूल कोचिंगला जात नसेल, तर ते मागे पडत आहे. ही प्रतिष्ठेची शर्यत झाली आहे."
पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून 'शक्ती की सप्तधारा' द्वारे विकासासाठीच्या प्रमुख क्षेत्रांची घोषणा केली. १. उत्पादन: जागतिक मानकांनुसार खर्च, गुणवत्ता आणि उत्पादन प्रमाण अत्यंत स्पर्धात्मक असणे आवश्यक आहे. २. कृषी आणि अन्न प्रक्रिया: आपल्या उत्पादनांना जागतिक ब्रँड बनवण्याची गरज आहे. ३. तंत्रज्ञान आणि नवोपक्रम: डिजिटल आणि दळणवळण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ४. गती-शक्ती: जलद आणि अखंड कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करणे. ५. रक्षा शक्ती: ड्रोन, सुपरसॉनिक तंत्रज्ञानासारख्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे. ६. हरित आणि नील अर्थव्यवस्था: आपल्याकडे हरित आणि नील अर्थव्यवस्थेसाठी प्रचंड संसाधने आहेत. ७. देशाच्या सॉफ्ट पॉवरवर लक्ष केंद्रित करणे: योग, आयुर्वेद, समग्र आरोग्य, सर्जनशील संसाधने, पर्यटन यांना मान्यता देणे.
इतर महत्वाच्या बातम्या
