पटना: नोटाबंदीवरुन राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार यांच्यावर नोटाबंदीवरुन टीकास्त्र सोडलं आहे. 'या निर्णयामुळे भाजपची बिहारपेक्षाही वाईट अवस्था उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत होईल. तसंच 50 दिवसांनंतर पंतप्रधान मोदीं कोणत्या चौकात शिक्षा द्यायची?' असा बोचरा सवाल त्यांनी केला.
पटनामधील एका कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्या वेळी बोलताना लालूंनी मोदींवर टीका केली. 'नोटाबंदीनंतर पंतप्रधान म्हणाले होते की, 50 दिवसानंतर परिस्थिती सुधारली नाही तर तुम्ही म्हणाल तिथं मला द्याल ती शिक्षा मी स्वीकारेल.'
त्यामुळे आता मोदींनीच सांगावं की, कोणत्या चौकात त्यांना शिक्षा देण्यात यावी.' असा सवाल लालूंनी मोदींना केला होता. उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजपला अपयश पाहावं लागेल. असंही लालू म्हणाले
दरम्यान, 13 नोव्हेंबरला गोव्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शिक्षा देण्याचं वक्तव्य केलं होतं.