PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या, 26 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Tour) येणार आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी शिर्डीत (Shirdi Visit) दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डीत पोहोचणार आहेत. पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डी येथे पोहोचतील. पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिरात (Shirdi Sai Baba Temple) दर्शन घेऊन मंदिरात पूजाही करणार आहेत. दिवसभर सामान्य भक्तांना साईमंदिरात दर्शन नियमितपणे सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीतील साई मंदिराला भेट देणार असल्याने केवळ आर्धा तास मोदी आल्यानंतर समाधी मंदिरात प्रवेश बंदी असेल.
शिर्डी साई मंदिरात दर्शन, विविध प्रकल्पांचं लोकार्पण
पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावेळी महाराष्ट्रातील जनतेला मोठी भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांनी पायाभरणी करण्यात येणार आहे. शिर्डी साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचे जलपूजन करणार आहेत. यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जाईल. त्यानंतर पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्यासाठी रवाना होतील.
2018 नंतर मोदी शिर्डीच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 2018 नंतर पुन्हा एकदा शिर्डीच्या दौऱ्यावर येत असून दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बैठकांचा सपाटा सुरु आहे.
पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा कसा असेल?
पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी 26 ऑक्टोबरला दुपारी अहमदनगर जिल्ह्यात दाखल होतील. तिथे ते साईबाबा मंदिरात दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतील आणि गोव्यासाठी रवाना होतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :