PM Modi reply to discussion on Motion of Thanks: मी काँग्रेसच्या मित्रांचेही आभार मानतो कारण त्यांना माहिती होते की त्यांनी आधी प्रयोग करून पाहिले आहेत. गेल्या 10 वर्षांत मला 5-6 वेळा बोलण्यापासून रोखण्यात आले. त्यांना माहित होते की एकदा मी बोलायला सुरुवात केली की मी थांबत नाही, असे पीएम मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले. विरोधकांनी गोंधळ न घालता शांतपणे भाषण ऐकल्याबद्दल ते म्हणाले की, आता ते अनुभवातून शिकले आहेत की येथे त्यांची डाळ शिजणार नाही. म्हणून त्यांनी समजूतदारपणा दाखवला.
मी दररोज 2 किलो शिव्या खातो
विरोधकांच्या 'मोदी तेरी कब्र खुदेगी' या घोषणांचा उल्लेख करत ते म्हणाले की, "ज्या माणसावर देशातील कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद आहेत, ज्याच्या पाठीशी कोट्यवधी माता-भगिनींचे रक्षाकवच आहे, तुम्ही कितीही घोषणा द्या, माझी कबर तुम्ही खोदू शकणार नाही." आपल्या विरोधात होणाऱ्या वैयक्तिक टीकेबद्दल ते म्हणाले की, "गेल्या 25 वर्षांपासून संसदेचे एकही अधिवेशन असे गेले नाही, ज्यामध्ये मोदींना शिव्या देण्याचे काम या लोकांनी केले नसेल. जेव्हा मला कोणी विचारते की तुमच्या आरोग्याचे रहस्य काय आहे, तेव्हा मी सांगतो की मी दररोज २ किलो शिव्या (गाली) खातो."
140 कोटी देशवासी हा माझा रिमोट
सरकार कोणाच्या इशाऱ्यावर चालते यावर भाष्य करताना ते म्हणाले, "यांचे सरकार रिमोटने चालायचे, माझे सरकारही रिमोटने चालते... १४० कोटी देशवासी हा माझा रिमोट आहे. त्यांच्या स्वप्नांसाठी आणि आकांक्षांसाठी आम्ही जगतो." त्यांनी ठामपणे सांगितले की, "आम्ही विकसित भारताचा पाया मजबूत करत आहोत आणि या प्रवासात आता आम्हाला थांबायचे नाही किंवा मागे वळून पाहायचे नाही, तर केवळ ध्येय प्राप्त करायचे आहे." पंतप्रधानांनी हे मुद्दे मांडताना असा विश्वास व्यक्त केला की, जनतेच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना अशा अडथळ्यांनी रोखणे शक्य नाही.
'ग्लोबल साऊथ'चा बुलंद आवाज बनला
भारत आज जगासाठी 'विश्वमित्र' आणि 'विश्वबंधू' बनला असून अनेक देशांचा विश्वासू भागीदार आहे. ते म्हणाले, "भारत आज जागतिक मंचावर 'ग्लोबल साऊथ'चा बुलंद आवाज बनला आहे.". भारताने अनेक मोठ्या देशांसोबत भविष्यातील व्यापार करार केले आहेत. देशात उत्पादनासाठी मजबूत इकोसिस्टम तयार झाली आहे. ते म्हणाले की, "कदाचित आपण आज पूर्ण विमान बनवत नसू, पण विमानाचे अनेक सुटे भाग (Purze) माझ्या देशातील छोटे छोटे एमएसएमई उद्योग बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या