PM Modi on Ukraine Russia War : युक्रेन आणि रशियामधील युद्दामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. यासाठी 'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga) हाती घेण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन गंगाचा उल्लेख भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक असा केला आहे. पंतप्रधान म्हणाले की, 'इतर कोण्यत्याही देशाला जमले नाही ते भारताने करुन दाखवले आहे. ऑपरेशन गंगा हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे. सर्व अडकलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हे भारताच्या वाढत्या शक्तीचे प्रतिक आहे. नवी पिढी भाग्यवान आहे, ते आता देशात पूर्वी चालत असलेल्या बचावात्मक भूमिका घेण्याच्या काळात नाही.'
पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की, 'भारत आता अनेक क्षेत्रात अव्वल होत आहे, भारत आज दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल निर्माण करणारा देश आहे, आधी डिफेन्स मध्ये आयात करावी लागत होती, आता आपण डिफेन्स मध्ये आपण एक्स्पोर्ट करू शकत आहे.' 'देशातील सरकार आज देशातील तरुणांच्या बळावर अवलंबून आहे. म्हणूनच सरकार तुमच्यासाठी एकामागून एक सेक्टर उघडणार आहे. या संधींचा पुरेपूर फायदा घ्या', असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे लोकार्पण आणि इतर प्रकल्पांचा शुभारंभ, पायाभरणी कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात भविष्यातील शहरांच्या विकासाच्या अनुषगांचे पायाभूत सुविधांवर भर देण्याच्या आवश्यकता अधोरेखित करताना पर्यावरणपूरक धोरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
- PM Modi in Pune : आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही; मेट्रो लोकार्पणानंतर पंतप्रधानांचा टोला
- महत्वाच्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा टोला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha