PM Narendra Modi Speech : आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण (Independence Day 2022) झाली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावर (Red Fort) ध्वजवंदन केलं. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांना अभिवादन करत पंतप्रधानांनी देशवासीयांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नवा नारा दिला आहे.
'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'
पंतप्रधान मोदी यांनी 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'ची घोषणा केली आहे. लाल बहादूर शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यात 'जय विज्ञान' जोडले. आणि आता त्यात 'जय अनुसंधान' जोडण्याची वेळ आली आहे. आता 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नारा पंतप्रधानांनी दिला आहे.
पुढील 25 वर्षांसाठी योजना तयार
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, आपण येत्या 25 वर्षांसाठी आपले संकल्प पंचप्राणावर केंद्रीत करायला हवं. 2047 मध्ये या पंचप्राणांसह स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा आपल्याला भारतप्रेमींचीही स्वप्नं पूर्ण करायची आहेत. आपल्याला नव्या आत्मनिर्भर भारताचा संकल्प करायचा आहे. स्वत: सह भारतालाही आत्मनिर्भर बनवायचं आहे. यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे. विविधतेतील एकता संपूर्ण जगाला दाखवायची आहे, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं आहे.
'पंचप्राण' वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपल्याला पाच मोठे संकल्प घेऊन पुढे जायचं आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. येत्या काळात आपण 'पंचप्राण' वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पहिले - विकसित भारताचे मोठे संकल्प आणि संकल्प घेऊन पुढे जा; दुसरे - गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका; तिसरे - आपल्या वारशाचा अभिमान बाळगा; चौथे - एकतेचे सामर्थ्य आणि पाचवे - नागरिकांची कर्तव्ये ज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.