PM Modi Netherlands Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान, भारताने देशातील सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्थेला चालना देण्यासाठी शनिवारी (16 मे, 2026) नेदरलँड्ससोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. हा करार भारताच्या टाटा ग्रुप आणि नेदरलँड्सच्या एएसएमएल (ASML) यांच्यात झाला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या करारामुळे भविष्यातील तांत्रिक क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ होईल. तरदुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉयल पॅलेसमध्ये नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की, 11व्या शतकातील चोल राजवंशातील ताम्रपट आता नेदरलँड्समधून भारतात परत आणले जातील. या ऐतिहासिक निर्णयाबाबत पंतप्रधान म्हणाले की, हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचीत्यांनीप्रतिक्रियादेतआनंदव्यक्तकेला.

PM Modi : टाटा ग्रुप आणि एएसएमएल यांच्यातील करारावर, पंतप्रधान मोदी म्हणाले...

पंतप्रधान मोदींनी या संदर्भात 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. ते म्हणाले, "पंतप्रधान रॉब झायटन आणि मी, भारतातील सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्थेला पुढे नेण्यासाठी टाटा ग्रुप आणि एएसएमएल यांच्यातील करारावर स्वाक्षरी होताना उपस्थित होतो. एएसएमएल गुजरातच्या धोलेरा येथे टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या आगामी सेमीकंडक्टर कारखान्याच्या स्थापनेसाठी आणि विस्तारासाठी सहकार्य करेल." ते म्हणाले, "सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची प्रगती आपल्या तरुणांसाठी मोठ्या संधी घेऊन येत आहे. हे असे क्षेत्र आहे, ज्यात आम्ही भविष्यात आमचा व्यापार अधिक गतीमान आणि मजबूत करत राहू."

PM Modi Netherlands Visit: भारत-नेदरलँड्स भागीदारी संबंधांना नवी चालना देत आहे: पंतप्रधान मोदी

नेदरलँड्समधील हेग येथे आर्थिक संबंधांवरील सीईओ गोलमेज परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील मजबूत होत असलेली सामरिक भागीदारी आमच्या व्यापारी संबंधांना नवी चालना देत आहे. आता या दिशेने वेगाने पुढे जाण्याची जबाबदारी तुमच्या (नेदरलँड्सच्या) हातात आहे. मला विश्वास आहे की तुम्ही आता भारतात तुमची व्याप्ती, गुंतवणूक आणि महत्त्वाकांक्षा वाढवाल आणि संपूर्ण युरोपियन नवोन्मेष परिसंस्था तुमच्यासोबत भारतात येईल."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (१६ मे, २०२६) रॉयल पॅलेसमध्ये नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की, 11 व्या शतकातील चोल राजवंशातील ताम्रपट आता नेदरलँड्समधून भारतात परत आणले जातील. या ऐतिहासिक निर्णयाबाबत पंतप्रधान म्हणाले की, हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.

 Chola Dynasty: चोल राजवंशातील ताम्रपट भारतात आणले जाणार

पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत लिहिले, "प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आनंदाचा क्षण! चोळ राजवंशातील ताम्रपट नेदरलँड्समधून भारतात परत आणले जाणार आहेत. पंतप्रधान रॉब जेटेन यांच्या उपस्थितीत मी या समारंभात सहभागी झालो. हे चोळ ताम्रपट 24 पट्टिकांचा संच असून, त्यात 21 मोठ्या आणि 3 लहान पट्टिकांचा समावेश आहे. ते जगातील सर्वात सुंदर भाषांपैकी एक असलेल्या तमिळमध्ये लिहिलेले आहेत." हे दस्तऐवज महान राजा राजेंद्र चोल प्रथम यांच्या काळातील आहेत, ज्यांनी त्यांचे वडील, राजा राजाराजा प्रथम यांनी दिलेल्या तोंडी वचनाला औपचारिक स्वरूप दिले.

PM Modi : आम्हा भारतीयांना चोलांचा, त्यांच्या संस्कृतीचा आणि त्यांच्या सागरी सामर्थ्याचा प्रचंड अभिमान

तप्रधान मोदी यांनी लिहिले, "हे दस्तऐवज चोलांची महानता देखील दर्शवतात. आम्हा भारतीयांना चोलांचा, त्यांच्या संस्कृतीचा आणि त्यांच्या सागरी सामर्थ्याचा प्रचंड अभिमान आहे. मी नेदरलँड्स सरकारचे आणि विशेषतः लीडेन विद्यापीठाचे आभार मानतो, जिथे 19व्या शतकाच्या मध्यापासून हे ताम्रपट जतन करून ठेवले आहेत." हे ताम्रपट शंभर वर्षांहून अधिक काळ डच प्रशासनाकडे होते. ते म्हणाले, "नेदरलँड्समध्ये एक म्हण आहे की जहाजे बंदरात सुरक्षित असतात, पण जहाजे बंदरात थांबण्यासाठी बनलेली नसतात. डच व्यावसायिक समुदायापेक्षा हे अधिक चांगले कोणाला समजेल? तुमचा देश शतकानुशतके नवीन संधींच्या शोधात पुढे जात आहे. मी तुम्हाला खात्री देतो की तुमचा भारताचा शोध यशस्वी आणि फलदायी ठरेल. आता तुम्ही भारतात धैर्याने पुढे जायला हवे."

इतर महत्वाच्या बातम्या