PM Modi Flies in Tejas Fighter Jet : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेजस (Tejas) लढाऊ विमानातून (Fighter Jet) उड्डाण केलं आहे. त्यांनी तेजस फायटर जेटमधून (Fighter Jet Tejas) उड्डाण केलं. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आज बंगळुरुमध्ये (Bengluru) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL - Hindustan Aeronautics Limited) कंपनीला भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून हवाई पाहणी केली.


पंतप्रधानांचं तेजस लढाऊ विमानाने उड्डाण


भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) अधिक लढाऊ विमाने, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर (LCH - Light Combat Helicopter) खरेदी करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या दृष्टीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) कंपनी काम करत आहे, त्यामुळे HAL चर्चेत आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या बंगळुरु येथील कंपनीला भेट दिली आहे.


वायूदलात स्वदेशी बनावटीची विमाने


अलिकडच्या काळात भारत स्वदेशीवर भर देत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वदेशी बनावटीची विमाने वायूदलात भरती करण्यासंदर्भातही करार करण्यात आले आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचं लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तेजस त्यापैकीचं आहे.  इतकंच नाही तर इतर देशांनीही LCH-तेजस फायटर जेट खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.


बंगळुरुमधील HAL प्लांटला भेट


भारतीय हवाई दलाने आणखी लढाऊ विमाने आणि हलके लढाऊ हेलिकॉप्टर (LCH) तेस खरेदी करण्याची आणि सुखोई-30 श्रेणीतील विमानांमध्ये सुधारित करण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे वायुसेना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या लवकरच अब्जावधी डॉलर्सचे संभाव्य करार होण्याची शक्यता आहेत. यातच आज पंतप्रधान मोदी यांनी HAL च्या बंगळुरु येथील प्लांटला भेट दिली आहे.


स्वदेशी HAL फ्रेंच कंपनी सफ्रान (Safran) कंपनी सोबत संयुक्तपणे हेलिकॉप्टर इंजिन डिझाइन आणि विकसित करण्यावर काम सुरू करणार आहे. US फर्म GE Aerospace सोबत देशात फायटर जेट इंजिनच्या संयुक्त उत्पादनासाठी करारावरही चर्चा सुरु आहे. HAL ने पूर्वी सांगितल्याप्रमाणे, लढाऊ विमाने आणि मूलभूत प्रशिक्षकांसाठी IAF च्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी LCA Mk-1A आणि हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (HTT-40) विमानांसाठी नाशिकमध्ये नवीन उत्पादन प्लांट सुरु करण्याची तयारी सुरु आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या  : 


2024 मध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! नऊ लाँग वीकेंड, वर्षभर फिरण्याचा आनंद घ्या