श्रीनगर: जम्मू- काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री उशिरा भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेचा निषेध करुन यावर दु:ख व्यक्त केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहले आहे की, "मी माझ्या तीन युवा कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध करतो. ते जम्मू-काश्मीरमध्ये चांगले काम करत होते. या दुखद प्रसंगात माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."





कुलगाम जिल्ह्यातील पोरा भागात दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये फिदा हुसेन, उमर हाजम आणि उमर राशिद बेग यांचा समावेश आहे. गोळ्या घातल्यानंतर त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जम्मू-काश्मीर भाजपाने यास हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.


जम्मू-कश्मीरचे पूर्व मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरंसचे नेते उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, "दक्षिण कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून एक भयंकर बातमी येत आहे. मी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध करतो. अल्ला त्यांना स्वर्गात जागा देवो आणि त्यांच्या परिवाराला या कठीण प्रसंगाचा सामना करण्याची शक्ती देवो."





'द रेजिस्टंस फ्रंट’ ने हल्ल्याची जबाबदारी स्विकारली


लष्कर-ए-तोयबाच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी 'द रेजिस्टंस फ्रंट' (TRF) या संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. आपल्या सोशल मीडियावर टाकलेल्या संदेशात पुन्हा अशा प्रकारच्या हल्ल्याची धमकी देत 'द रेजिस्टंस फ्रंट'ने म्हटले आहे की, "स्मशानभूमीत जागा मिळणार नाही इतक्या लोकांना मारु."


पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. संपूर्ण परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. याबाबत सर्च ऑपरेशनही सुरु आहे.


महत्वाच्या बातम्या :