PM modi Cabinet Meeting : आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळासोबतची ही शेवटची बैठक असेल, असे मानले जात आहे. पंतप्रधान वेळोवेळी मंत्रिपरिषदेच्या बैठका घेऊन प्रमुख धोरण आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करत आहेत, एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. निवडणूक आयोग येत्या काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो.


सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विश्वास


आज दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे. मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. चाणक्यपुरी डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह येथील सुषमा स्वराज भवनात ही बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारच्या कामगिरीसह विविध मुद्यांवर चर्चा होऊ शकते. भारतीय जनता पक्ष (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) विकास योजनांच्या आधारे मोदींच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.


 


महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता


लोकसभेची अधिसूचना जारी होण्यापूर्वी 3 मार्च म्हणजेच आज मोदी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांव्यतिरिक्त राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री सहभागी होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मंत्री परिषदेच्या सदस्यांना व्यस्त ठेवण्यासाठी पंतप्रधान या बैठकीत अनेक निर्देश देण्यात येतील. या बैठकीत काही महत्त्वाच्या घोषणा होण्याचीही शक्यता आहे.


 


मंत्र्यांना पुढील 100 दिवसांचा अॅक्शन प्लान, पाच वर्षांचा रोडमॅप तयार करण्याचे निर्देश


आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा विश्वास असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना पुढील 100 दिवसांचा कृती आराखडा आणि पाच वर्षांचा रोडमॅप तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यापूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना विजयाची चिंता न करता आपापल्या मंत्रालयांसाठी रोडमॅप तयार करण्यास सांगितले.


 


पक्ष संघटनेला 100 दिवसांचे काम


पक्षाच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत, पंतप्रधान मोदींनी पक्ष संघटनेला पुढील 100 दिवसांत सर्व बूथपर्यंत पोहोचण्यास सांगितले होते, विशेषत: ज्या तरुणांनी पहिल्यांदा मतदान केले आणि ज्यांनी भाजपला मतदान केले नाही त्यांच्याशी संवाद साधावा. संपर्कासाठी त्यांना कॉल करावा. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर पक्षाने या दिशेने व्यापक कृती आराखडा तयार केला जात आहे.


 


 


हेही वाचा>>>


BJP Candidates List 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत मोदी सरकारमधील दिग्गज मंत्र्यांना वगळलं, पाहा संपूर्ण यादी