Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल) दुपारी झालेल्या हल्ल्यानंतर एकूण 26 जणांचे प्राण गमावले आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पहलगामचा आतंकी परिस्थितीची माहिती मिळतात सौदी अरेबियामधून ते भारतात परतले . मंगळवारी सकाळी दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर पंतप्रधान रवाना झाले होते . हल्ल्याची माहिती मिळताच सौदी अरेबिया होऊन परत येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केलेला नाही .  2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात घातक हल्ला मानला जातोय . हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा मध्येच थांबवला आणि ते दिल्लीला रवाना झाले . जेद्दाहून परतताना पंतप्रधान मोदींचे विमान IF बोईंग 777- 300 (KA06 ) ने पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर न करता भारतात परतले .सौदी अरेबियाला जाताना पाकिस्तान हद्दीचा वापर करण्यात आला होता . (Pakistan)

PM मोदी आणि गृहमंत्री अमित शहा CCS सोबत घेणार बैठक

दिल्लीला परत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ( NSA) अजित डोवाल तसेच परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जय शंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याशी बैठक घेतली .दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा सध्या श्रीनगर मध्ये आहेत .तिथे त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली असून नंतर घटनास्थळाला ही भेट दिली आहे .गृहमंत्री अमित शहा परतल्यानंतर ते पंतप्रधान मोदी तसेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) सोबत बैठकही घेतील .

'कोणालाही सोडणार नाही'..पंतप्रधान म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात असताना गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याची माहिती दिली .पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x माध्यमावर पोस्ट करत हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला .या हल्ल्यात जो कोणी सहभागी असेल त्याला सोडले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली .पिढी त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन दिले .या भयानक गुन्ह्यामागे जो कोणी असेल त्याला शिक्षा केली जाईल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत .आम्ही त्यांना त्यांच्या अजेंड्यात यशस्वी होऊ देणार नाही .दहशतवाद विरुद्ध लढण्याचा निर्धार दृढ आणि दृढच आहे, असेही त्यांनी सांगितले .

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर पर्यटक

प्रत्यक्ष दर्शनी सांगितलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी प्रथम पर्यटकांची नावे नंतर त्यांचा धर्म विचारला आणि नंतर जबरदस्तीने कलमा म्हणण्यास सांगितले .ज्यांना कलमा म्हणता येत नव्हता किंवा ज्यांना संकोच वाटत होता त्यांना तिथेच गोळ्या घालून ठार मारण्यात आले .या हल्ल्यात दहशतवादांनी बहुतेक हिंदू पुरुषांना लक्ष केले होते .प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी आणि मुलासोबत काश्मीरला गेलेल्या पतीला पत्नी आणि मुलाच्या देखतच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या .जेव्हा महिलेने तिलाही गोळी घालण्यास सांगितले तेव्हा हल्लेखोर म्हणाले 'आम्ही तुम्हाला गोळ्या घालणार नाही जाऊन मोदींना हल्ल्याबद्दल सांगा . '

पहलगाम हल्ल्याचा मास्टर माईंड कोण ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यात आठ ते दहा दहशतवादी सहभागी असू शकतात .त्यापैकी दोन ते तीन स्थानिक मदतनीस होते .हे पोलिसांच्या गणवेशात फिरत असल्याचा संशय आहे .त्यापैकी पाच ते सात जण पाकिस्तानी वंशाचे असल्याची माहिती ही समोर आली आहे .दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी लष्करे तय्यबाच्या रेजिस्टन्स फ्रंट टीआरएफने स्वीकारली आहे .या हल्ल्याचा मास्टर माइंड लष्कराचा उपप्रमुख सैफुल्ला खालीद आहे .ज्याला सैफुल्लाह कसुरी म्हणूनही ओळखले जाते अशी माहिती समोर येत आहे .

हेही वाचा: