PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे आज (27 फेब्रुवारी) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) तेरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेरावा हफ्ता शेतकऱ्यांना (Farmers) कधी मिळणार याची प्रतिक्षा होती. अखेर आज PM किसान योजनेचा तेरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, सर्व कागदपंत्राची (EKYC)  पूर्तता करणारे आणि ज्यांचे आधार बँक खात्याला संलग्न आहे, त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. चार महिन्यांच्या अंतराने दोन दोन हजार रुपये करुन, ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत 12 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आज तेरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. 


PM किसानच्या रकमेत वाढ केली जाण्याची होती चर्चा 


गेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) रकमेत वाढ होण्याच्या संदर्भात चर्चा सुरु होती. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ही मदत आता आठ हजार रुपये होणार असल्याची चर्चा सुरु होती. पंतप्रधान सन्मान निधीची रक्कम वाढणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी लोकसभेत माहिती दिली होती. सध्या PM किसान सन्मान निधीत वाढ केली जाणार नसल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. कृषीमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या तरी PM किसान सन्मान निधीचा हफ्ताची रक्कम वाढण्याची शक्यता दिसत नाही.


बारावा हफ्ता मिळण्यासही झाला होता विलंब


बारावा हफ्ता शेतकऱ्यांना मिळण्यास बराच विलंब झाला होता. बारावा हफ्ता जारी करताना केंद्र सरकार अपात्रांची वर्गवारी करण्यात गुंतले होते. कोणत्याही अपात्र व्यक्तीच्या खात्यात पैसे पोहोचू नये, असा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. या कारणामुळे सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात आले होते. यात असे अनेक लोक असले तरी जे पात्र होते मात्र ई-केवायसीमुळे हफ्ता मिळू शकला नाही. 


महत्त्वाच्या बातम्या:


PM Kisan Yojana: अकाउंटमध्ये येणार पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता; तुम्हाला मिळणार की नाही? असे तपासा