Petrol Diesel Price Hike: अमेरिका (America) आणि इराणमधील (Iran) वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती भडकल्या असून भारतातही शुक्रवारी (15 मे) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ (Petrol Diesel Price Hike) करण्यात आली आहे. मात्र, सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नसता, तर हे दर आजच्या तुलनेत दोन ते तीन पटीने जास्त असते, अशी माहिती समोर आली आहे.

Petrol Diesel Price Hike: काय आहेत नवे दर?

राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 3.14 रुपयांची वाढ होऊन ते 97.77 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 3.11 रुपयांनी महागून 90.67 रुपये प्रति लिटर झाले आहे. यासोबतच सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता दिल्लीत सीएनजी 79.90 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 106.54 प्रति लिटर झाले आहे. 

Petrol Diesel Price Hike: इंधन दरवाढीमागचे 'हे' आहे खरं कारण

मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक संकटामुळे तेल कंपन्यांना दररोज सुमारे 1,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी तेल कंपन्या स्वतःच्या खिशातून पेट्रोलवर 26 रुपये आणि डिझेलवर तब्बल 82 रुपये प्रति लिटरचा भार उचलत आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने यापूर्वीच पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये उत्पादन शुल्क (Tax) कमी केले आहे. जर हा आधार नसता, तर पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले असते, ज्यामुळे शेतकरी आणि वाहतूक क्षेत्र पूर्णपणे कोलमडले असते.

Fertilizers and Rationing: खत आणि रेशनिंगची स्थिती

इंधनासोबतच सरकारने शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. बाजारात 2,200 रुपयांना मिळणारी खताची गोणी शेतकऱ्यांना केवळ 242 रुपयांत उपलब्ध करून दिली जात असून उर्वरित रक्कम सरकार अनुदान म्हणून भरत आहे. जगातील सुमारे 82 देशांमध्ये सध्या इंधनाचे रेशनिंग (मर्यादित पुरवठा) सुरू आहे. आग्नेय आशियात तेलाच्या किमती 50 टक्क्यांनी, तर युरोपमध्ये 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत, मात्र भारताने अद्याप ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

PM Narendra Modi: पंतप्रधानांचे आवाहन

हे संकट बाह्य परिस्थितीमुळे उद्भवले असून भारत कोणत्याही दबावाखाली निर्णय घेणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना परदेश प्रवास कमी करण्याचे, सोने खरेदीवर नियंत्रण ठेवण्याचे आणि इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. सध्या भारतीय कुटुंबांकडे सुमारे 30 हजार टन सोने असून त्याची किंमत 400 लाख कोटी रुपये आहे. सोन्याची आयात हा देशाचा दुसरा मोठा खर्च बनला असून तो कमी करणे गरजेचे असल्याचे सरकारने म्हटले आहे.

आणखी वाचा 

Petrol-Diesel Price Hike: ज्याची भीती होती, तेच झालं..., देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर