Petrol-Diesel Price Hike: सर्वत्रमहागाईचाभडकाउडालाअसतानात्यातपुन्हाकाहीशीभरघालणारीबातमीसमोरआलीआहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत इंधनाच्या दरात दरवाढ होण्याची ही चौथी वेळ आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ (Petrol And Diesel Prices Rise) झाली आहे. दिल्लीत डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 2.76 रूपये वाढले असून मुंबईत पेट्रो 111.21 रूपये प्रति लीटर, तर डीझेल 2. 81 रूपयांनी वाढून 97.83 रूपये प्रति लीटर इतके झाले आहे. (Petrol And Diesel Prices Rise)

Petrol-Diesel Price Hike: दहा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ

सर्वात महत्वाचीबाबम्हणजे, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. पहिली दरवाढ 15 मे रोजी सुमारे ₹3 ने झाली. त्यानंतर 19 मे रोजी सुमारे 90 पैशांनी, पुन्हा 23 मे रोजी सुमारे 90 पैशांनी आणि आता, 25 मे रोजी पुन्हाएकदा लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ₹7.35 ने आणि डिझेल प्रति लिटर ₹7.53 ने महाग झाले आहे.

Petrol-Diesel Price Hike: राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर (25 मे 2026)

मुंबई 

पेट्रोल: नवीन दर 111.12 रुपये/लिटर, जुना 108.39 रुपये/लिटर दरवाढ 2.73 रुपये

डिझेल: नवीन दर 97.68 रुपये/लिटर, जुना 94.97 दरवाढ 2.81रूपये

------------------------------------------

नागपूर मध्ये पेट्रोल 2.72 पैशाने वाढले सध्या पेट्रोल 111.70  रुपये झाले 

तर डिझेल 2.81 पैशानी वाढले डिझेल चे नवीन दर 98.76 रुपये झाले.

------------------------------------------

सोलापूर पेट्रोल/डिझेल दर जुने  - पेट्रोल - 109.14डिझेल - 95.74

आज - पेट्रोल - 111.87डिझेल - 98.55

------------------------------------------

कोल्हापूर

पेट्रोल काल - 109.36आज -  111.77

डिझेलकाल -  96.08आज -  98.46

------------------------------------------

भंडारा : पेट्रोल / डिझेल दर

109.60 (पेट्रोल जुना दर)112.32 (पेट्रोल नवा दर)

96.18 (डिझेल जुना दर)98.99 (डिझेल नवा दर)

------------------------------------------

नाशिक पेट्रोल आणि डिझेल आणि दरवाढ

आजपासून नवीन दर

Petrol 112.47Diesel 99.11

जुने दरPetrol 109.74Diesel 96.30

------------------------------------------

वाशिमपेट्रोल / डिझेल दर

109.83 (पेट्रोल जुना दर)112.44 (पेट्रोल नवा दर)

95.46 (डिझेल जुना दर)98.17(डिझेल नवा दर)

------------------------------------------

रायगड

इंधनाचे नवीन दर(प्रतीलीटर) 

पेट्रोल - 112.08 ₹

डिझेल - 98.70 ₹

------------------------------------------

हिंगोलीजुने दरपेट्रोल 110.29डिझेल 96.86

नवे दर पेट्रोल 113.02डिझेल 99.67

सांगली:

पेट्रोल नवीन दर 111.69 (2.73 पेट्रोल वाढ)

डिझेल 98.40 (2.80 डिझेल वाढ)

गोंदिया : पेट्रोल / डिझेल दर

110.44 (पेट्रोल जुना दर)113.17 (पेट्रोल नवा दर)

97.02 (डिझेल जुना दर)99.83 (डिझेल नवा दर)

अमरावती: पेट्रोल / डिझेल दर

सध्याचे दर

पेट्रोल - 112.78डिझेल - 98.43

आधीचे दर

पेट्रोल - 110.05डिझेल - 96.63

गोवा

आजचे दरपेट्रोल: 104.80, डिझेल : 96.65,

कालचे दरपेट्रोल : 102.13, डिझेल : 93.91

नंदुरबार 

 पेट्रोल - 109.01 रु.लिटरआजचे पेट्रोल दर 111.71 डिझेल - 95.52 रु. लिटरडिझेलचा आजचा दर 98.23

जळगाव

पेट्रोल कालचे दर - 110.45आजचे पेट्रोल दर- 113.18 एकूण पेट्रोल मधे 2 रुपये 71 पैसे वाढ

डिझेल कालचे दर - 97.02 डिझेल आजचे दर- 99.83

बुलढाणा - पेट्रोल 112.49 ( आजचा )  / 2.72 वाढल 

डिझेल - 99.16 ( आजचा ) / 2.81

चंद्रपूर पेट्रोल डिझेल किंमत

जुने दर पेट्रोल - 109.06डिझेल - 95.68

नवीन दर पेट्रोल -111.79डिझेल - 98.49

धारशिव पेट्रोल/डिझेल दरजुने - पेट्रोल - 109.88डिझेल -96.45

आज - पेट्रोल - 112.61डिझेल -99.25

पेट्रोल आणि डिझेलसाठी जागतिक स्तरावर तीव्र मागणी (Global Turmoil Over Petrol and Diesel Prices)

लंडनमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 190 च्या वर गेले आहेत. युरोपियन युनियनमध्येही दर प्रति लिटर ₹179 च्या वर गेले आहेत. सध्या जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये आहे, जिथे दर प्रति लिटर जवळपास 300 पर्यंत पोहोचले आहेत. नेदरलँड्समध्ये सध्या पेट्रोल 2.90 USD ला विकले जात आहे, जे भारतीय चलनात अंदाजे 245-₹255 प्रति लिटर इतके होते.