Petrol Diesel price hike: पंतप्रधान नरेंद्र मोदी तमाम देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे कळकळीचे आवाहन केल्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel price) दरात आता तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सर्वप्रथम 15 मे रोजी पेट्रोलच्या (Petrol Price) दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच 20 मे रोजी  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्यावेळी पेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली. त्यानुसार पेट्रोलचा प्रतिलीटर दर 87 पैसे आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 91 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.45 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 95.02 रुपयांवर पोहोचला आहे. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही तफावत आहे. तर दिल्लीत सीएनजीच्या दरात एका रुपयाने वाढ झाली आहे. दिल्लीत आता सीएनजीचा प्रतिकिलो दर 81.09 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. (Fuel Price Hike)

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झाली आहे. अवघ्या आठ ते नऊ दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. आगामी काळात खनिज तेलाचे दर वाढून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Petrol and Diesel today price)

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवत आहे. बुलढाणा, जळगाव आणि वाशिममध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याने पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या आहेत. 

Mumbai Petrol and Diesel rates

पेट्रोल- 108.45डिझेल-95.02

Parbhani Petrol and Diesel rates

पेट्रोल- 110.45 पैसेडिझेल- 97.02

Kolhapur Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.30डिझेल-  95.89

 Bhandara Petrol and Diesel rates

109.60 (पेट्रोल नवा दर)

96.18 (डिझेल नवा दर)

Solapur Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.14डिझेल-  95.74

Amravati Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.15डिझेल-  95.68 Washim Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.79डिझेल-  96.39 Nashik Petrol and Diesel rates

पेट्रोल- 109.71डिझेल-  96.26

Nagpur Petrol and Diesel rates

पेट्रोल- 108.97डिझेल-  95.58

Ratnagiri Petrol and Diesel rates

पेट्रोल - 110.44डिझेल - 97.01

Ahilyanagar Petrol and Diesel rates

पेट्रोल - 108.87डिझेल - 95.47

Pune Petrol and Diesel rates

Petrol - 108.76Diesal - 94.40

Akola Petrol and Diesel rates

पेट्रोल - 109.05डिझेल - 95.63

Beed Petrol and Diesel rates

पेट्रोल - 110.38डिझेल - 96.92

Chhatrapati Petrol and Diesel rates

पेट्रोल - 110.44डिझेल - 97.10