Petrol Diesel Price Today : सर्वसामान्यांना इंधन दरवाढीतील दिलासा कायम आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 प्रतिलीटर आणि आणि डिझेलचा दर 94.14 प्रतिलिटर रुपयांवर स्थिर आहेत. मागील काही दिवसांपासून इंधन कंपन्यांनी इंधन दरात कोणतीही वाढ झालेली नाही. जवळपास महिनाभरापासून इंधन कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहेत. 


देशाची राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकातासह देशातील विविध शहरांमध्ये रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम राहिले आहेत. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 86.67 प्रतिलीटर आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 109.98 प्रतिलीटर आणि 94.14 प्रतिलीटरवर स्थिर आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रतिलीटर तर कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर  अनुक्रमे 101.40 रुपये आणि 91.43 रुपये आहेत.


बेंगळुरूमध्ये पेट्रोल 100.58 प्रति लिटर आणि डिझेल 85.01 आणि हैदराबादमध्ये, एक लिटर पेट्रोल आता 108.20 आणि डिझेल एक लिटर डिझेलसाठी 94.62 ला मोजावे लागत आहेत. इंधन दर स्थानिक कर आणि वाहतूक खर्चावर अवलंबून असल्याने दर राज्यानुसार इंधनाचे दर बदलतात.


दरम्यान, केंद्र सरकारने वॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोलवरील एकूण कर 50 टक्क्यांपर्यंत आणि डिझेलवर कर 40 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे ज्या राज्यांनी स्थानिक विक्री करातही कपात केली आहे. अशा राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल अधिक स्वस्त आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha