श्रीनगर : जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीडीपी' पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती दहशतवाद्यांसंदर्भातील वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं मुफ्ती म्हणाल्या.
काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र आहेत. काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे.
जम्मू काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केवळ फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करणं पुरेसं नाही, दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवायला हवा, असं मुफ्ती यांनी सुचवलं.
'आपल्याला यश मिळेल, हा विचार करुन 2014 निवडणुकांच्या आधी काँग्रेसने अफझल गुरुला फाशी दिली होती. आज भाजपही त्याची पुनरावृत्ती करत आहे. त्यांनी कन्हैया, उमर खलिद आणि जम्मू काश्मिरच्या सात-आठ विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे' असं मुफ्ती म्हणाल्या.
मेहबुबा मुफ्ती यांना दहशतवाद्यांचा एवढा कळवळा का? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मुफ्ती यांचं हे वक्तव्य म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र : मेहबुबा मुफ्ती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jan 2019 10:40 AM (IST)
जम्मू काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केवळ फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करणं पुरेसं नाही, दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवायला हवा, असं जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सुचवलं.
फोटो सौजन्य : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -