'डबे घसरले नि डोळ्यादेखत त्या चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे'
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2016 10:56 AM (IST)
कानपूर : पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या दुर्घटनेत अनेक प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात एका चिमुरडीचे माझ्या डोळ्यादेखत दोन तुकडे झाले, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. 'नवभारत टाइम्स'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. दोन वर्षांची एक चिमुरडी उज्जैनहून तिच्या कुटुंबीयांसोबत ट्रेनने प्रवास करत होती. अख्ख्या प्रवासात ती मजा-मस्ती करत येत होती. मात्र पहाटेच्या सुमारास तो भीषण अपघात झाला नि आमच्या डोळ्यांदेखत तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले, असा दावा संबंधित प्रवाशाने केला आहे.