Rajnath Singh on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये (London) मोदी सरकारवर (Modi Government) केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, कुणीही देशाबाहेर जाऊन देशाचा अपमान करु नये. खासदाराला असं वर्तन शोभत नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. या मुद्द्यावरुन संसदेत सत्ताधारी भाजप खासदार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.


राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गदारोळ


संसदेत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, सभागृहातील सदस्य राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताचा अपमान केला. त्यांच्या वक्तव्याचा सभागृहातील सर्व सदस्यांनी निषेध करावा, अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली. तर राज्यसभेतील सभागृहात पियुष गोयल यांनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. या गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.


काय म्हणाले होते राहुल गांधी?


काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अलिकडेच त्यांच्या लंडन दौऱ्यावर असताना तेथील कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला आहे. आरएसएस ही फॅसिस्ट संघटना असून भारतातील लोकशाही मोडण्यासाठी तयार झालेली गुप्त संघटना असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. लंडन येथील चॅथम हाऊस येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे भाष्य केलं. 






अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Parliament Budget Session) दुसऱ्या टप्प्याला आजपासून (13 मार्च) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज 13 मार्च रोजी संसदेत जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो. आज 13 मार्चपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून हे अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत असेल. 


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याला 31 जानेवारी रोजी सुरुवात झाली. जेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं. यानंतर आता अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरु झाला असून 6 एप्रिलपर्यंत पार पडेल.


पंतप्रधानांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याआधी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी कॅबिनेट मंत्र्यांसोबत (Cabinet Meeting) महत्त्वाची बैठक घेतली. संसदीय रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसरा टप्पा आज सोमवारपासून सुरु होत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rahul Gandhi On RSS : RSS ही फॅसिस्ट संघटना; राहुल गांधी यांनी केली मुस्लिम ब्रदरहूडसोबत तुलना