पणजी (गोवा) : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाली आहेत. पर्रिकरांनी काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांचा 4 हजार 800 मतांनी पराभव केला.


"मी लढवय्या आहे. पणजीमधील जनतेसाठी यापुढे देखील उपस्थित राहीन.", अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश चोडणकर यांनी दिली.

वाळपईतून राणे विजयी

वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या रॉय नाईक यांचा राणेंनी पराभव केला आहे. विश्वजीत राणे तब्बल 10 हजार 66 मतांनी विजयी झाले आहेत.

मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या मनोहर पर्रिकरांनी पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली. आज पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून, पर्रिकर चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या गिरीश चोडणकरांचा त्यांनी पराभव केला आहे. तर पर्रिकरांच्याच मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री असलेल्या विश्वजीत राणेंनीही भरघोस मतांनी विजयाला गवसणी घातली आहे.