India Pakistan war : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या युद्धजन्य (India Pakistan war) परिस्थितीला विराम मिळाला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झालं आहे. भारताचे सगळे लष्करी तळ, युद्धसामग्री सुस्थितीत असल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी ( Colonel Sofia Qureshi) यांनी दिली. युद्धबंदीच्या घोषणेनंतर तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली.
पाकिस्तानने भारताच्या नुकसानीबाबत दिलेली माहिती खोटी
भारतीय सैन्य दल सतर्क आहे. भारतीय सैन्य दल भारताचे रक्षण करण्यासाठी पूर्ण तयार आहे. पाकिस्तानने भारताच्या नुकसानीबाबत दिलेली माहिती खोटी असल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: लष्करी तळांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती कुरेशी यांनी दिली आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणावर होता. या तणावानंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू होते. अखेर, या हल्लेखोरीला अखेर युद्ध विराम मिळाला आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीने दीर्घ चर्चेनंतर युद्धबंदीवर सहमती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर आता भारत सरकारने देखील अधिकृतपणे याबाबतची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून 3.35 वाजता अधिकृपणे फोन आल्यानंतरच भारताने शस्त्रसंधी निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळे, पाकिस्तान नरमल्यानंतर भारताकडून अधिकृतपणे युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना 15.35 वाजता फोन आला. दोन्ही बाजूंकडून फायरिंग, लष्करी कारवाया, हवाई आणि सागरावरुन होणाऱ्या कारवाया आज 5 वाजल्यापासून थांबवल्या जातील. डीजीएमओ 12 मे रोजी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.
महत्वाच्या बातम्या: