एक्स्प्लोर

Shehbaz Sharif On Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, 265 जणांचा मृत्यू; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले...

Air India Plane Crash In Ahmedabad: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अहमदाबादमधील विमान अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (12 जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान (Air India Plane Crash In Ahmedabad) अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे.

सदर विमान अपघातानंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अहमदाबादमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावर 20 मिनिटं नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. अपघाताची कारणं, झालेलं नुकसान याची माहिती नरेंद्र मोदींनी घेतली. तसेच पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्याचं पाहायला मिळाले. विमान अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदी रुग्णालयात देखील गेले. यावेळी अपघातातील जखमींची नरेंद्र मोदींनी विचारपूस केली. रूग्णालयात नरेंद्र मोदी जवळपास 10 मिनिटे उपस्थित होते. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif Post On Ahmedabad Airplane Crash) यांनी अहमदाबादमधील विमान अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. 

गुजरातमध्ये विमान अपघात, शाहबाज शरीफ यांचं ट्विट- (Shehbaz Sharif Post On Ahmedabad Airplane Crash)

अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif Post On Ahmedabad Airplane Crash) यांनी एक्सवर ट्विट करुन दुःख व्यक्त केलं आहे. अहमदाबादजवळ एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्दैवी अपघाताने दुःख झाले. या प्रचंड नुकसानीबद्दल आम्ही पीडितांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त करतो. कुटुंबातील व्यक्तींना गमावणाऱ्या लोकांसोबत आम्ही आहोत. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले. 

विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू-

महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे. मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल हे मुंबईत पवई इथले आहेत. क्रू मेंबर अपर्णा महाडिक गोरेगावच्या तर  साईनीता चक्रवर्ती जुहूच्या तर रहिवासी आहेत. क्रू मेंबर रोशन सोनघरे या डोंबिवलीकर आहेत. तर दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. मैथिली पाटील पनवेलजवळील न्हावा गावच्या आहेत. प्रवाशांपैकी आशा पवार आणि महादेव पवार दाम्पत्य हे पंढरपूरचे रहिवासी आहेत. तर मयूर पाटील या रहिवाशाची अजून माहिती समजलेली नाही. तर यशा कामदार या नागपूरच्या आहेत. 

संबंधित बातमी:

Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबाद विमान अपघातात फक्त 1 प्रवासी बचावला; 11 A सीट ठरली लकी, या सीटचं वैशिष्ट्य काय?

Air India Plane Crash In Ahmedabad: Airplane Mode म्हणजे नेमकं काय?; विमान प्रवासादरम्यान चालू करणे आवश्यक असते?, पाहा A टू Z माहिती

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Akhilesh Yadav: 'यांची हिम्मत तर बघा, भाजपकडून इतिहासाची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांना पुन्हा अमानुष मारहाण'; अखिलेश यादवांकडून व्हिडीओ पोस्ट करत संताप, संजय राऊतांसह रोहित पवारही भडकले
'यांची हिम्मत तर बघा, भाजपकडून इतिहासाची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांना पुन्हा अमानुष मारहाण'; अखिलेश यादवांकडून व्हिडीओ पोस्ट करत संताप, संजय राऊतांसह रोहित पवारही भडकले
Rohit Pawar: शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक; पाठीशी ठामपणे उभे, उपकार...; प्रधानांच्या राजीनाम्यावरती दिलेल्या फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर रोहित पवारांचा संताप
शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक; पाठीशी ठामपणे उभे, उपकार...; प्रधानांच्या राजीनाम्यावरती दिलेल्या फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर रोहित पवारांचा संताप
West Bengal Gunda Act: कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
Dharmendra Pradhan Resign: मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा? सरसंघचालकांच्या 'त्या' भूमिकेने सरकार बॅकफूटवर; चर्चांना उधाण
मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा? सरसंघचालकांच्या 'त्या' भूमिकेने सरकार बॅकफूटवर; चर्चांना उधाण

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget