Pahalgam Terror Attack Shawl Hawker Video पहलगाम : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल ) ला दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला.  भारतानं या हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पहलगाम येथील स्थानिक शाल विक्रेता सज्जाद अहमद भट जखमींना पाठीवर घेऊन सुरक्षित स्थळी घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडिओतील युवक सज्जाद अहमद भट याच्याशी एएनआयनं संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की या घटनेची माहिती पहलगाम मधील अब्दुल वहीद वानी यांनी माहिती दिली. बैसरन घाटीत हल्ला झाल्याची माहिती दिली, यामुळं आम्ही दुपारी 3 च्या दरम्यान तिथं पोहोचलो.  

सज्जाद अहमद भट यानं त्या घटनेसंदर्भात म्हटलं की त्यांनी जखमींना पिण्यासाठी पाणी दिलं, जे लोक चालू शकत नव्हते त्यांना घोड्यांवर बसवलं, काही जण चालू शकत नव्हते त्यांना पाठीवर उचलून घेतलं आणि रुग्णालयापर्यंत पोहोचवलं, असं सांगितलं.  बैसरण मधील घोडेस्वार संघटनेचे अध्यक्ष देखील तिथं आले होते. काही जणांना घोड्यावर बसवलं, स्थानिक लोकं आले,जे जखमी होते त्यांना पाठीवर घेत रुग्णालयात नेलं, असं सज्जाद अहमद भट म्हणाला.  माणुसकीच्या नात्यानं, पहिल्यांदा माणुसकी असून नंतर धर्म आहे, त्यामुळं काही जणांना आम्ही रुग्णालयात नेलं. आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नव्हती कारण आम्ही तिथं गेलो तेव्हा पर्यटकांना मदत केली, ते मदतीसाठी विनंती करत आहेत. 

जेव्हा पर्यटकांना रडताना पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. पर्यटकांमुळं आमचं घर चालतं. आम्हाला एकटं सोडू नका, पर्यटकांशिवाय आमचं जीवन अपूर्ण आहे. पहलगाममधील सर्व बाजारपेठा, छोटी दुकानं देखील बंद झालं. धर्म नंतर येतो पहिल्यांदा माणुसकी येते, असं सज्जाद भट म्हणाला. काश्मिरी लोकांना वेगळं काढू नका, काश्मिरी हिंदुस्थानी भाऊ भाऊ आहेत, तुमच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे, असं सज्जाद भट म्हणाला. 

व्हायरल व्हिडिओ संदर्भात काय ?     

सज्जाद अहमद भट याचा एका मुलाला पाठीवर घेऊन धावत जातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ संदर्भात एएनआयशी बोलताना तो म्हणाला की, त्या मुलाचे आई वडील असे तिघं होतं. त्या मुलाची आई  होती तिला घोड्यावर बसवून रुग्णालयापर्यंत पोहोचवलं. त्या मुलाला पाठीवर घेत दवाखान्यात पोहोचवलं, असं सज्जाद अहमद भट यानं सांगितलं. 

#WATCH | Pahalgam, J&K | In a viral video on social media, Sajad Ahmad Bhat, a shawl hawker from Pahalgam, can be seen carrying a tourist injured in the #PahalgamTerroristAttack to safety on his back. He says, "... The Pahalgam Poney Association president, Abdul Waheed Wan,… pic.twitter.com/cBNTFu3LDA

— ANI (@ANI) April 24, 2025

व्हायरल व्हिडिओ

दरम्यान, भारतानं पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत. सरकारनं 1960 चा सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान सोबतचे राजनैतिक संबंध देखील कमी करण्याचं सरकारनं ठरवलं आहे.