Pahalgam terror attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणाव वाढत आहे. भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर पाकिस्तान देखील भारताला चिथावणी देण्याचं कृत्य करत असल्याचं दिसत आहे. पाकिस्तान या आठवड्यात जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी करत असल्याची माहिती विशेष सुत्रांनी दिली आहे.

जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याती तयारी

जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी म्हणजे हे पाकिस्तानचे चिथावणी देण्याचे एक निष्काळजी कृत्य आहे. ही भारताविरुद्ध अत्यंत धोकादायक मोहिम असल्याचं समजतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून, पाकिस्तानने बेफिकीरपणे नौदलाला इशारे दिले आहेत. अरबी समुद्रात सराव वाढवला आहे आणि नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. अशा अस्थिर परिस्थितीतही नियोजित क्षेपणास्त्र चाचणी ही उघड चिथावणी आहे. भारतासोबत तणाव वाढवण्याचा एक हताश प्रयत्न असल्याचे दिसत आहे. 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला, 26 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणाचा तपास आताएनआयएकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. दहशतवादी पहलगाममध्ये 2-3 दिवस आधीच दाखल झाले होते. 20 आणि 21 तारखेला पाऊस पडल्यानं पहलगाममध्ये पर्यटक संख्या कमी होती. 22 तारखेला पाऊस नसल्यानं पर्यटक वाढले आणि दहशतवाद्यांनी हल्ला केला. बैसरनमध्ये पाऊस पडल्यानं दोन दिवस हल्ला लांबला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. तपास यंत्रणा असलेल्या एनआयएच्या (NIA) हाती या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे लागले असून, दहशतवाद्यांनी वापरलेली हत्यारे बेताब खोऱ्यात लपवून ठेवली होती, हे तपासात स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यामागे लश्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानचा एकत्रित कट होता. ही कारवाई पूर्वनियोजित होती आणि तिची आखणी पाकिस्तानमधून करण्यात आली होती, असेही तपासात समोर आले आहे. तर पाकिस्तानच्या पाठबळावर चालणाऱ्या संघटनांचा संपर्क 'हमास'शी असल्याची माहिती मिळाली आहे. हमासने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसोबत आयोजित केलेल्या एका रॅलीत सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, पहलगाम हल्ल्यातील एक संशयित आरोपी देखील या रॅलीत सहभागी होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ला होऊन दहा दिवस लोटले, नुसता गडगडाटच, जो गरजते हैं वो बरसेंगे क्या? ठाकरे गटाच्या नेत्याचा मोदी सरकारवर प्रहार