Jammu Kashmir : 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack)  झाला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात (India Pakistan) कठोर पावले उचलली होती. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्थ केले होते. दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी जम्मू काश्मीरकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही विदेशी पर्यटकांकडून 2026 चे जम्मू काश्मीरचं बुकिंग रद्द करण्यात आले आहे. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे पर्यटन विस्कळीत

डियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी  दिलेल्या माहितीनुसार, इटलीसह जगभरातील अनेक देशातील पर्यटकांकडून जम्मू काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरु करायचे असेल तर आपले एक डेलीगेशन अनेक देशात जाऊन एडवाइजरी हटवण्याची मागणी करायला हवी असे ते म्हणाले. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे पर्यटन विस्कळीत झालेले पाहायला मिळत आहे. आता जम्मू काश्मीरचे पर्यटन हळूहळू सुरु होत आहे. पण अद्याप आंतरराष्ट्रीय पर्यटक जम्मू काश्मीरकडे आलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी 2006 चे ही बुकिंग रद्द केल्याची माहिती इंडियन असोसिएशन टूर ऑपरेटरचे प्रमुख दीपक मनवानी यांनी दिली आहे. पर्यटक लवकर या भागात येण्यास तयार होणार नाहीत. त्यांच्या लवकर आत्मविश्वास तयार होणार नाही यासाठी वेळ लागेल. आता अमरनाथ यात्रा नीट करावी लागेल ते झाले की पर्यटकांचा आत्मविश्वास वाढेल असे  दीपक मनवानी म्हणाले.  

अमरनाथ यात्रा यशस्वी झाली तर सगळे सुरळीत होईल

आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी जम्मू काश्मीरच्या 2026 च्या बुकिंग रद्द केल्या आहेत.  जर हे सुरु करायचे असेल तर इतर देशांनी लावलेल्या एडवाइजरी काढव्या लागतील असे दीपक मनवानी म्हणाले. आपल्याला देशातून डेलीगेशन पाठवावे लागेल आणि सांगावे लागेल की जम्मू काश्मीर सुरक्षित आहे. अमरनाथ यात्रेसाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक नोंदणी करतील का? हे ही मुश्किल आहे. त्यांना आणावे लागेल. येत्या 6 महिन्यांमध्ये जर अमरनाथ यात्रा यशस्वी झाली तर सगळे सुरळीत होईल त्यामुळे मग पर्यटन वाढेल आणि पर्यटक येतील असे दीपक मनवानी म्हणाले.  टूरिस्ट कंपनी जे आहेत ते ही नीट पॅकेज तयार करत आहेत. पण अमरनाथ यात्रेमुळे सुरक्षिततेचा विषय समोर येईल. त्यांनतरच आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि इतर पर्यटक येतील असे  दीपक मनवानी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या, 24 कोटी लोकांचे जीवन धोक्यात, संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकची ओरड, भारताचं सडेतोड उत्तर