एक्स्प्लोर

Pahalgam terror Attack Anna Hazare : 1965 च्या युद्धात पाकिस्तानने आमच्या तुकडीवर एअर स्ट्राईक केला, माझ्या डोक्याला जखम झाली, पहलगाम हल्ल्यानंतर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Pahalgam terror Attack Anna Hazare : काही देशविरोधी लोकांना एकोप्याने राहणारे लोक नको आहेत. म्हणून ते असे खोडसाळ कृत्य करतात, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

Pahalgam terror Attack Anna Hazare : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. या भ्याड हल्ल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णा हजारे म्हणाले की, काही देशविरोधी शक्तींना भारतातील शांतता, एकोप्याचे वातावरण खपवत नाही, म्हणूनच ते अशा खोडसाळ आणि क्रूर कृत्यांना प्रवृत्त होतात. अशा घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. मात्र, आपण घाबरून जायचं नाही. देशाने एकत्र येऊन अशा हल्ल्यांचा विरोध करायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.  

1965 च्या युद्धाची आठवण

या प्रसंगी बोलताना अण्णा हजारे यांनी 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणीही सांगितल्या आहेत. “त्यावेळी मी काश्मीरमध्ये होतो. आमच्या सैन्यतुकडीवर पाकिस्तानी लढवय्या विमानांनी हल्ला केला होता. त्यात अनेक जवान शहीद झाले होते आणि माझ्याही डोक्याला गंभीर जखम झाली होती,” असे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी अनेक जवानांनी बलिदान दिले आहे. आजही देशविरोधी शक्तींविरोधात लढणारे आपले सैनिक सज्ज आहेत आणि त्यांच्यावर संपूर्ण देशवासियांचा विश्वास आहे, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले. 

सिंधू नदीचं पाणी थांबवणं योग्यच

दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत विचारले असता अण्णा हजारे म्हणाले की, नाक दाबलं की तोंड उघडतं, अशी एक जुनी म्हण आहे. त्यामुळे सिंधू नदीचं पाणी थांबवणं ही कृती योग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय लष्कराची ताकद वाढणार

दरम्यान, भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला स्वीडनकडून एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी शस्त्र प्राप्त झाले असून, ते म्हणजे कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर. हे शस्त्र स्वीडनच्या ‘साब’ कंपनीने पुरवले असून, सर्जिकल स्ट्राइकसारख्या कारवायांमध्ये याचा वापर होतो, ही यंत्रणेची खास वैशिष्ट्ये आहेत. ‘कार्ल गुस्ताफ’ हे एक अँटी-आर्मर रॉकेट लाँचर असून, शत्रूचे बंकर, दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स आणि रणगाडे यांना लक्ष्य करत त्यांचा संपूर्ण विनाश करण्याची क्षमता या शस्त्रात आहे. रणांगणात शत्रूकडून तोफा, रणगाडे किंवा अन्य जड शस्त्रे उतरवली गेल्यास, त्यांचा मुकाबला करण्यासाठी हे रॉकेट लाँचर अतिशय प्रभावी ठरते. भारतीय लष्कराच्या शस्त्रसज्जतेत या नव्या समावेशामुळे लष्कराची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

 इतर महत्त्वाच्या बातम्या 

IND VS PAK: भारतीय सैन्यदलातील विमानांना दोन मिनिटांत सज्ज राहण्याचे आदेश; LOC वरील गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी पाठवले, घडामोडींना वेग

Pahalgam Zipline Video: पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडीओ, पर्यटक झिपलाईनिंग करत असताना खाली गोळीबार, हल्ल्यात वाचलेल्या ऋषी भट यांनी सांगितला थरार

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Ketaki Chitale : जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Sanjay Raut on PM Narendra Modi: पीएम मोदी म्हणाले, मला मुलांना माफ करायचंय, संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोचरी टीका; म्हणाले, ही अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी?
पीएम मोदी म्हणाले, मला मुलांना माफ करायचंय, संजय राऊतांची पंतप्रधानांवर बोचरी टीका; म्हणाले, ही अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget