कर्नाटक विधानसभा : सर्व चॅनल्सचे एक्झिट पोल फक्त एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2018 08:34 PM (IST)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत भाजप बाजी मारत असल्याचं आतापर्यंतच्या अनेक एक्झिट पोलमधून पाहायला मिळत आहे.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत भाजप बाजी मारत असल्याचं आतापर्यंतच्या अनेक एक्झिट पोलमधून पाहायला मिळत आहे. 2013च्या तुलनेत काँग्रेसची पिछेहाट होत असून भाजप इथं जोरदार मुसंडी मारत असल्याचं दिसून येत आहे. एकूण 224 जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजप जवळपास 107 हून अधिक जागा जिंकू शकतं असं एबीपी न्यूज आणि सीव्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. एबीपी न्यूज आणि सीव्होटरचा एक्झिट पोल : काँग्रेस - 88 भाजप - 107 जेडीएस - 25 इतर चॅनलचे एक्झिट पोल :आज तक काँग्रेस - 112 भाजप - 85 जेडीएस - 26 टाइम्स नाऊ काँग्रेस - 96 भाजप - 86 जेडीएस - 35 न्यूज एक्स काँग्रेस - 75 भाजप - 106 जेडीएस - 37 रिपब्लिक टीव्ही काँग्रेस - 77 भाजप - 104 जेडीएस - 37 संंबंधित बातम्या :