Opration Sindhoor: भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. काल (7 मे) मध्यरात्री 1.05 वाजताच्या सुमारास भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. भारतीय लष्कराकडून 15 दिवसात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला होता. ऑपरेशन सिंदूरआधी भारताला रशिया, अमेरिका आणि जपानने पाठिंबा दिला होता. तर पाकिस्तानच्या मदतीला चीन पुन्हा एकदा धावून आला.

ऑपरेशन सिंदूरच्या एक दिवसआधीच (6 मे) इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तान दौऱ्यावर होते. यावेळी भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेतून तोडगा काढावा, असं आवाहन अब्बास अराघची यांनी पाकिस्तानमधून केलं होतं. तसेच पाकिस्तानच्या दौऱ्यानंतर अब्बास अराघची भारत दौऱ्यावर देखील येणार होते. मात्र दुसऱ्याच दिवशी (7 मे) मध्यरात्री भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला. त्यानंतर आज अब्बास अराघची भारतात दाखल झाले आहेत. मैत्री कराराच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारत-इराण संयुक्त आयोगाच्या बैठकीत दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आज दिल्लीत दाखल झाले. दक्षिण आशियातील भारताचा सच्चा मित्र म्हणून इराणची ओळख आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि इराणमध्ये नेमकी काय चर्चा होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'सिंदूर'ने दहशतवाद्यांना दिला 'करारा जवाब'-

ऑपरेशन सिंदूर यशस्वी करुन भारतीय सैन्यानं केवळ पहलगाम हल्ल्याचाच बदला घेतला नाही, तर त्याआधीच्या सहा हल्ल्यांचा एकत्रित वचपा काढलाय. गेल्या अडीच दशकात भारतात सहा मोठे दहशतवादी हल्ले झाले. संसदेवरचा हल्ला, अक्षरधाम मंदिरावरचा हल्ला, मुंबई अटॅक, उरी, पुलवामा आणि आताच्या पहलगाम हल्ल्यात शेकडो निष्पापांचा बळी गेला. पण ऑपरेशन 'सिंदूर'ने दहशतवाद्यांना 'करारा जवाब' दिलाय. 

भारताचे जेम्स बॉन्ड अजित डोवाल-

भारतीय लष्कराकडून 15 दिवसात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. अवघ्या 25  मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा हा तिसरा यशस्वी एअर स्ट्राईक होता. पण ही सगळी मोहीम यशस्वी करण्यामागे एक नाव होतं ते म्हणजे अजित डोवाल. या यशस्वी मोहिमांमुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची इमेज भारताचे जेम्स बॉन्ड अशी झाली आहे. 

संबंधित बातमी:

China On Operation Sindoor: भारताकडून एअर स्ट्राईक; पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणारा चीन भडकला, म्हणाला...

Iran On India And Pakistan: दक्षिण आशियातील भारताचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या इराणचं पाकिस्तानमधून मोठं विधान; परराष्ट्रमंत्री म्हणाले...