Operation Sindoor: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकव्याप्त काश्मीर मधील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी हवाई हल्ल्याचे कौतुक केले असून सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आणि लष्कराच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा असल्याचे या बैठकीत सांगितले. ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या या बैठकीत मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला अनुपस्थित असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
काय म्हणाले मल्लिकार्जून खरगे?
तसेच तुम्ही जे काम करत आहात ते करत रहा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत असेही खरगे यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीत त्यांनी राफेल पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याचा ही उल्लेख केला. परंतु कोणीही सरकारला या मुद्द्यावर उत्तर देण्यास सांगितले नाही. सर्वपक्षीय बैठकीनंतर बाहेर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'आम्हाला जे सांगण्यात आले ते आम्ही ऐकले. आम्ही सरकारला पाठिंबा दिलाय. या घडीला आम्ही सरकारसोबत आहोत असे खर्गे म्हणाले. पंतप्रधानांना कदाचित वाटते की ते संसदेच्या वर आहेत. वेळ आल्यावर आपण बोलू पण सध्या आपण कोणावरही टीका करणार नसल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.
राहूल गांधी म्हणाले...
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्ही देशाच्या हितासाठी सरकारसोबत राहू असे म्हटले आहे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले आम्ही एकजूट आहोत आणि सुरुवातीपासून सरकारसोबत आहोत. काही चिंताजनक बाबी आहेत पण ठीक आहे. ही एकजूट राहण्याची वेळ आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपण सर्वांनी सरकारला पाठिंबा दिल्याचं सांगितला आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलण्यासाठी चार ते पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. काँग्रेस सोबत समाजवादी पक्षानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला.
लढाऊ विमानाच्या व्हायरल पोस्टवर काय झालं?
बठिंडा येथे लढाऊ विमान पाडण्यात आल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टचा मुद्दा ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (MIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उपस्थित केला .बैठकीच्या सुरुवातीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारच्यावतीने ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती दिली .या ऑपरेशनचे अंतर्गत तपशील यात देण्यात आले नाहीत .सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारसोबत एकजूट असल्याचं व्यक्त करत आम्ही एकत्र आहोत असे सांगितले .
किरण रिजिजू म्हणाले?
संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू म्हणाले , हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे .त्यामुळे याबाबत स्वतंत्रपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही .हा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि प्रत्येकाने अत्यंत गांभीर्याने आपले विचार या बैठकीत व्यक्त केले आहेत .किरण रिजीजू म्हणाले की देशातील सर्व राजकीय पक्ष ऑपरेशन सिंदूरबाबत समान वक्तव्य करत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे असेही रिजिजू म्हणाले .
सर्व राजकीय पक्षांनी ऑपरेशन सिंदूर नंतर एक परिपक्वता दाखवली आहे .भारताची लोकशाही ही तेवढीच परिपक्व असल्याचं देशातील राजकीय पक्षांनी दाखवून दिले आहे .जेव्हा आपण अशा विषयांवर बोलतो तेव्हा त्यात राजकारणाला काहीच महत्त्व नसते .असेही ते म्हणाले .
हेही वाचा: