Operation Sindoor: पहलगाम  दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं क्षेपणास्त्र हल्ला करत पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांचे तळ उधळून लावले.आपरेशन सिंदूर हल्ल्यानंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. आता 10 मे पर्यंत देशभरातील 9 विमानतळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यात जम्मू काश्मीर, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भुज, श्रीनगर, लेह, जामनगर या विमानतळांच्या नावांचा समावेश आहे. एअर इंडियाने 10 मे रोजी सकाळी 5.29 वाजेपर्यंत  या नऊ शहरांमधील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.  आज श्रीनगरचे विमानतळ पूर्णपणे बंद राहणार असून काश्मीरमधील तीन जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानी सीमेशी जवळ असून 10 मे पर्यंत या शहरांमधील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. (Airport Closed)

इंडिगो एअरलाइन्सने केली 160 देशांतर्गत उड्डाणे रद्द 

एअर इंडियासह इंडिगो एअरलाईन्सच्या 160 देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दिल्ली विमानळावरून वेगवेगळ्या विमान कंपन्यांनी 20 उड्डाणे रद्द केली आहेत. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर, भारताने बुधवारी पहाटे पाकिस्तान पाकिस्तान आणि पिओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. आता  हल्ल्यानंतर एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट या विमानकंपन्यांनी प्रवाशांसाठी एक नोट जारी केली आहे. ज्यात विमान उड्डाणे कधी व कोणत्या विमानतळावरून रद्द करण्यात आले आहेत याची माहिती आहे.

 

याशिवाय जम्मू- काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या संस्था आणि संवेदनशील क्षेत्रांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शाळा, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

एअरइंडियाने प्रवाशांसाठी ॲडवायजरी जारी केली असून ट्विटरवरही एक पोस्ट केली आहे. ज्यात 10 मे रोजी सकाळी 5.29 वाजेपर्यंत सर्व विमान उड्डाणे बंद राहणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.

 

श्रीनगर विमानतळ आज बंद

बुधवारी श्रीनगर विमानतळ नागरी उड्डाणांसाठी बंद राहील, अशी माहिती भारतीय हवाई दलाने (IAF) दिली असून श्रीनगर  विमानतळ बंद राहणार असल्याची पुष्टी केली आहे.श्रीनगर विमानतळ संचालक जावेद अंजुम यांनी काश्मीरमधील स्थानिक वृत्तसंस्थेला पुष्टी दिली की "विमानतळ बंद आहे आणि आज श्रीनगर विमानतळावरून कोणतीही नागरी उड्डाणे चालविली जाणार नाहीत."

काश्मीरच्या तीन जिल्ह्यांमधील शाळा महाविद्यालये बंद

अधिकृत निर्देशानुसार, काश्मीरमधील तीन जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये आज बंद राहतील."सध्याची परिस्थिती लक्षात घेता बारामुल्ला, कुपवाडा आणि गुरेझमधील शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये आजसाठी बंद राहतील. खबरदारीचा उपाय म्हणून अधिकृत सूचनांचे पालन करताना अधिकाऱ्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन केले आहे," असे काश्मीर विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी सांगितल्याचे स्थानिक वृत्त माध्यमांनी सांगितले.

'ऑपरेशन सिंदूर'ची वैशिष्ट्ये-

1. पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला2. भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकची कबुली 3. पाकव्याप्तच नव्हे पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त4. दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध 5. ९ तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा6. भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजासुद्धा नाही7. आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारताचे हल्ले 

हेही वाचा:

Operation Sindoor: मध्यरात्री 1.28 वाजता पाकिस्तानात घुसले, 1.51 वाजता मिशन पूर्ण केले; 23 मिनिटांत खेळ खल्लास; भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची A टू Z माहिती