Omar Abdullah On Pakistan: पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जम्मू काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार सुरु आहे. या दरम्या जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी खूप नुकसान झालं असून पाकिस्ताननं आता शस्त्र खाली ठेवावीत अन्यथा त्यांचं देखील नुकसान होईल, असा इशारा दिला आहे.  

ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं की, पाकिस्तानकडून सर्वसामान्य नागरिकांना निशाणा केलं गेलं आहे. जम्मू  शहरावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदा जम्मूला  लक्ष्य करण्यात आलं. आमच्या जवानांनी सर्व ड्रोन हाणून पाडले. एक ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला नाही. काश्मीरमध्येही तसाच प्रयत्न झाल्याचं ते म्हणाले.  

ही परिस्थिती आम्ही निर्माण केली नाही : ओमर अब्दुल्ला

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की ही स्थिती आम्ही निर्माण केलेली नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आमच्या लोकांवर हल्ला करण्यात आला, निष्पाप लोकांना मारलं गेलं. आम्हाला त्याचं उत्तर द्यायचं होतं. आता पाकिस्ताकडून हा वाद वाढवला जात आहे. पाकिस्तानला याचा फायदा होणार नाही, ते यात यशस्वी होणार नाही. पाकिस्ताननं त्यांच्या बंदूका शांत कराव्यात हे चांगलं असेल. काल रात्री जे झालं त्याला त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे.त्यांचंच नुकसान होईल, योग्य विचार करुन त्यांनी काम केलं पाहिजे, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले. 

पुंछमध्ये खूप नुकसान झालं

जम्मूच्या दौऱ्यावर असलेल्या ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं की पाकिस्तानी गोळाबारामुळं पुंछमध्ये अधिक नुकसान झालं आहे. सर्वाधिक मृत्यू पुंछमध्ये झाले आहेत, पुंछचे लोक सर्वाधिक जखमी आहेत. जम्मू रुग्णालयात दाखल असलेले सर्व लोक पुंछचे आहेत. गंभीर जखमी असलेल्या लोकांना चंदीगडला शिफ्ट करण्यात आलं आहे. पुंछमध्ये स्थिती खराब असल्याचं ओमर अब्दुल्ला म्हणाले. 

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरु केलं आहे. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरु आहे. पाकिस्ताननं भारतातील 15 शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्यचा प्रयत्न केला मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम एस 400 ते हल्ले नाकाम केले. 

लष्करप्रमुखांना पुढील 3 वर्षांसाठी सर्वाधिकार, संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट जारी; गृहमंत्र्यांचीही तातडीची बैठक

शरद पवारांचा पठ्ठ्या सरसावला, हातात बंदूक घेऊन सीमेवर जाण्यास तयार, तरुणांची मोठी फौज संघटीत