मुंबई : आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत खराब म्हणावा लागेल. कारण आज त्यांच्या अदानी ग्रुप कंपनींच्या मार्केट कॅपमध्ये 1 लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालं आहे. नॅशलन सिक्युरिटी डिपॉझिट लिमिडेटने (NSDL) तीन विदेशी फंड्सचे 43,500 कोटी रुपयांहून अधिकचे शेअर फ्रीज केले होते. यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात NSDL ने अदानी ग्रुपमध्ये पैसे गुंतवलेल्या तीन विदेशी फर्मचे खाती फ्रीज केल्याची बातमी समोर आली. अल्बुला इन्वेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्वेस्टमेंट फंड या तीन फर्ममधले तब्बल 43500 कोटी रुपयांचे शेअर्स फ्रीज केले आहेत. अदानी ग्रुपच्या शेअर्समधली गेल्या वर्षभरातली वाढ ही कृत्रिम आहे का याबाबतही सेबी तपास करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस 6.82 टक्के, अदानी ट्रान्समिशनचे 8.03 टक्के, अदानी टोटल गॅसचे 5.92 टक्के आणि अदानी ग्रीनचे 3.58 टक्के शेअर्स आहेत. अकाऊंट फ्रीज झाले म्हणजे अदानी ग्रुप या फंडची कोणतीही सध्याची सिक्युरिटी विकू शकतो आणि खरेदी सुद्धा करु शकत नाही.
अदानी ग्रुपच्या काही कंपन्यांच्या शेअर्सने मोठी उसळी यावर्षी घेतली होती. यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत सुमारे 40 अरब डॉलरची वाढ झआली होती. ज्यानंतर ते आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते.
गौतम अदानी, 2020 म्हणजे कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिथं सगळेजण आर्थिक नुकसानीचे आकडे मोजत होते, त्याच वर्षात या एका उद्योगपतींच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली. अदानी ग्रुपचे काही शेअर्स एका वर्षात दुप्पट ते दहापट वाढले होते. पण गेल्या वर्षभरात शेअर बाजारात जबरदस्ती मुसंडी मारणाऱ्या अदानी ग्रुपच्या शेअर्स आज भूकंप झाल्यासारखे हादरले. एकाच दिवसात अदानी ग्रुपचं भांडवली बाजारातलं मूल्य तब्बल 1 लाख 3 हजार कोटी रुपयांनी कमी झालं.
अदानी ग्रुपमधील काही एफपीआय खाते जप्त केल्याच्या बातमीनंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी 25 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. या दरम्यान अदानी एन्टरप्रायझेस बीएसई 24.99 टक्के घसरण झाली, अदानी पोर्ट्स अॅंड स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये 18.75 टक्क्यांनी घसरण झाली. या व्यतिरिक्त अदानी ग्रीन एनर्जी पाच टक्के, अदानी टोटल गॅस पाच टक्के, अदानी ट्रान्समिशन पाच टक्के, अदानी पॉवरचे शेअर्स 4.99 टक्क्यांनी घसरले.