Nitin Gadkari on Electric bus : आता देशात अशा बस येणार आहेत की, ज्या विमानांसारख्या आलिशान असतील. या बस इलेक्ट्रीक असून पूर्णपणे आरामदायी आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे विमानांमध्ये एअर होस्टेस असतात, त्याचप्रमाणे बसमध्ये बस होस्टेस असणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबातची माहिती दिली आहे. भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी चांगली बनवण्यावर काम करत आहेत. सरकार अतिआधुनिक इलेक्ट्रिक बस चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे. ज्यामध्ये प्रवाशांना कॉफी, चहा, फळे आणि थंड पेयेची सुविधा असणारआहे. सध्या टाटाच्या सहकार्याने या प्रकल्पावर काम सुरु आहे.
बस सुविधा विमानासारखी असेल
या बसच्या भाड्याचा विचार केला तर, डिझेल बसच्या तुलनेत त्याचे भाडे सुमारे 30 टक्के असण्याची अपेक्षा आहे. एकीकडे, सार्वजनिक वाहतूक बस अतिआधुनिक आणि आरामदायी बनवण्याचा हा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे प्रवाशांचा प्रवास आनंददायी आणि संस्मरणीय बनवण्याचा त्याचा उद्देश आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर भर देताना नितीन गडकरी म्हणाले की, बोगदे, पूल आणि रस्ते बांधण्यासाठीही ते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा विचार करत आहेत.
बसमध्ये आसनांची क्षमता ही 135 राहणार
मिळालेल्या माहितीनुसार या बसमध्ये आसनांची क्षमता ही 135 राहणार आहे. या सर्व सीट वातानुकूलित असणार आहेत. तसेच खुर्च्या देखील आरामदायी असणार आहेत. प्रत्येक आसनासमोर टेलिव्हिजन आणि लॅपटॉप ठेवण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञान देखील देण्यात आलं आहे. बस होस्टेस प्रवाशांना फळे, फॅक केलेले खाद्यपदार्थ देतील. या योजनेचा पायलट प्रकल्प हा नागपूरमध्ये सुरु करण्यात आला आहे. या बस चालवण्यासाठी मोठा खर्च देखील येणार आहे. ही बस चालवण्यासाठी प्रति किलोमीटर 35 ते 40 रुपयांचा खर्च येणार आहे. 40 किलोमीटर प्रवास केल्यानंतर बस थांबेल. त्यानंतर अवघ्या 40 सेकंदात चार्जिंग पूर्ण होईल त्यामुळं पुढे 40 किलोमीटर जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
डोंगरी भागात कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत
डोंगराळ भागात, विशेषतः हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल. देशात आणि जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगाने वाढत आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत, नितीन गडकरी यांना आशा आहे की त्याचा वापर रस्ते पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकेल असे गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: