नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी जानेवारी किंवा फेब्रवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.


देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन शिक्षणाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पोखरीयाल म्हणाले, दरवर्षी 15 फ्रेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा कधी घेता येईल याविषयी विचार-विनीमय केल्यानंतरच अंतीम निर्णय घेण्यात येईल. परीक्षेविषयीची सर्व माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिली जाईल.


 कोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या कन्स्पेट अभ्यासक्रमात राहणार आहेत. हे. कोरोनाच्या संसर्ग वाढत असताना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.