एक्स्प्लोर

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या चर्चेवर गडकरी म्हणतात...

"2019 मध्ये भाजपला विजय हवा असेल तर भाजपचे नेतृत्त्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवा," अशी मागणी शेतकरी नेते आणि महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली होती.

मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वाबाबतच्या चर्चांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पडदा टाकला आहे. "मी जिथे आहे तिथे खूश आहे," असं स्पष्टीकरण नितीन गडकरी यांनी दिलं आहे. त्यामुळे 2019 मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे. शिवाय मोदी पुन्हा एकदा निवडणुकीत विजय मिळवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. "2019 मध्ये भाजपला विजय हवा असेल तर भाजपचे नेतृत्त्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवा," अशी मागणी शेतकरी नेते आणि महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांना पत्र पाठवलं होतं. 2019 मध्ये विजय हवा तर नेतृत्त्व गडकरींकडे सोपवा : किशोर तिवारी याविषयी विचारलं असता नितीन गडकरी म्हणाले की, "या मागणीचा कोणताच आधार नाही. सध्या मी जिथे आहे तिथे खूश आहे. मला आधी गंगेचं काम पूर्ण करायचं आहे. चारधाम आणि इतर स्थळांसाठी उत्तम रस्ते बनवणं माझं प्राधान्य आहे. ही कामं करण्यात मी आनंदी आहे आणि ती लवकर करायची आहेत." पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का सहन करावा लागला होता. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तांतर झालं. त्यानंतर पंतप्रधान मोदी लाट ओसरल्याची चर्चा सुरु झाली होती. "राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी", असे मेसेजही सोशल मीडियावर फिरले. त्यामुळे भाजपचं नेतृत्त्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात यावं, अशी मागणी किशोर तिवारी यांनी सरसंघचालकांकडे केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 At 8AM 27 Sept 2024Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसानएबीपी माझा मराठी  न्यूज हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines: 27 September 2024माझं गाव माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 630AM Superfast 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ रिलायन्स 880 एकर जमिनीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारणार,एमआयडीसीकडून हालचाली सुरु
रिलायन्स पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराजवळ टेक्स्टाईल पार्क उभारणार, एमआयडीसीकडून हालचाली सुरु
Sharad Pawar: आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं  टेन्शन वाढलं?
आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं टेन्शन वाढलं?
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतेय, दफनभूमी कोणाच्या मालकीची नाही; पालकांची उच्च न्यायालयात धाव
मुलाच्या दफविधीसाठी जागा मिळेना, मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा आरोप, अक्षय शिंदेच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव
Sunil Tatkare: अजितदादा महायुतीमधून बाहेर पडण्याची चर्चा सुरु असताना ट्विस्ट,  सुनील तटकरेंना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी
अजित पवारांच्या लाडक्या सहकाऱ्याला केंद्रात मोठी जबाबदारी, महत्त्वाच्या समितीचं अध्यक्षपद दिलं
Embed widget