नवी दिल्ली : कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी निती आयोग एक योजना आणण्याच्या तयारीत आहे. कॅशलेस व्यवहार करत असल्यास तुम्हाला आता एक कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेसाठी एकूण 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून महिनाअखेरपर्यंत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
दर तीन महिन्याला ट्रान्झॅक्शन आयडीचा ड्रॉ काढला जाईल. यातील विजेत्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. ट्रान्झॅक्शन आयडीचा ड्रॉ दर आठवड्यालाही काढण्यात येणार आहे. यातील विजेत्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दर आठवड्याला दहा ग्राहक आणि दहा व्यापाऱ्यांना हे बक्षीस देण्यात येणार आहे.
सर्वसामान्य नागरिक, गरीब, मध्यम आणि छोटे व्यावसायिक यांना या योजनेत प्राधान्य दिलं जाईल. कॅशलेस व्यवहारावेळी होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराच्या क्रमांकाचा एक लकी ड्रॉ काढला जाईल. विजेत्या ग्राहकाला हे 10 लाख रुपये मिळणार आहेत.