यंदाची महानगरपालिका निवडणूक तुमच्या-आमच्यासाठी खूप वेगळी असणार आहे. कारण मतदानाची पद्धत बदलली आहे आणि नियमही बदलले आहेत! आता तुम्हाला चार EVM वर मतदान करावं लागणार आहे. मुंबई वगळता 28 महापालिकांमध्ये निवडणूक बहुसदस्य पद्धतीने होणार आहे. म्हणजेच काय तर एका प्रभागातून एक नाही तर 4 नगरसेवक निवडले जाणार आहे. म्हणजे  काय तर प्रत्येक मतदाराला एका चार मतं द्यावी लागणार आहे. मुंबई वगळता राज्यातील 28 महापालिकांमध्ये आता 'बहुसदस्य पद्धत' लागू झाली आहे. याचा अर्थ असा की, तुमच्या एका प्रभागातून आता एक नाही, तर तब्बल 4 नगरसेवक निवडले जाणार आहेत.

जेव्हा तुम्ही मतदान केंद्रात जाल, तेव्हा तिथे तुम्हाला तुमच्या प्रभागानुसार 2 किंवा 4 EVM मशिन दिसतील. प्रत्येक जागेसाठी एक ठराविक रंग निश्चित केला आहे

जागा 'अ' साठी: पांढरा रंग

जागा 'ब' साठी: फिक्कट गुलाबी रंग

जागा 'क' साठी: फिक्कट पिवळा रंग

जागा 'ड' साठी: फिक्कट निळा रंग

या सर्व मशिनवर तुम्हाला एक एक बटन दाबायचे आहे. तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना देखील मतदान करू शकता.. किंवा नोटा बटन देखील दाबू शकता.  पण चार पैकी जर तुम्ही एकाही मशिनवर मतदान केलं नाही, तर तुमचं मतदान अपूर्ण राहणार आहे.  एक तांत्रिक गोष्ट लक्षात घ्या की, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मशिनवर मतदान केल्यावर फक्त लाल दिवा लागेल. कोणताही आवाज येणार नाही. जेव्हा तुम्ही चौथ्या आणि शेवटच्या मशिनवर बटण दाबाल, तेव्हाच 'बीप' असा आवाज येईल. तो आवाज आला की समजायचं तुमचं मतदान पूर्ण झालं!