New Rule From 1 April 2026: आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरु होत असून अनेक नवे नियम (New Rule From 1 April 2026) लागू होत आहेत. रेल्वे, आयकर कायदा, पॅन, आधार, परदेश प्रवास अशा अनेक क्षेत्रात हे बदल होत आहेत. आयकर कायद्यातील बदलांमुळे नोकरदारांसाठी होणारे बदल सुखावह आहेत. यानूसार नव्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे अर्थात मूळ वेतन हे वेतनाच्या 50% राहणार आहे. तर बेसिक पे वाढल्यानं ईपीएफ आणि ग्रॅच्युइटी वाढणार आहे. यासह अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. आजपासून मुंबईत विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरातही कपात होणार आहे. आजपासून नवे दर लागू होणार आहेत. तर नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात मात्र कोणतीच वाढ होणार नाही. आजपासून इंडिगो आणि एअर इंडियासह इतर कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. (New Rule From 1 April 2026)

Continues below advertisement

आजपासून काय काय बदलतंय? (New Rule From 1 April 2026)

  1. कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, सर्व कंपन्यांतील कंपन्यांचं पगारपत्रक बदलणार 
  2. नव्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे अर्थात मूळ वेतन हे वेतनाच्या 50% राहणार
  3. बेसिक पे वाढल्यानं ईपीएफ आणि ग्रॅच्युइटी वाढणार
  4. नोकरी संपताच ग्रॅच्युइटी वगळता सारे पैसे 2 दिवसांत मिळणार, सध्या 30 ते 90 दिवसांची मुदत
  5. 1961 चा इन्कम टॅक्स कायदा रद्द होऊन नवा इन्कम टॅक्स कायदा 1926 लागू होणार
  6. एप्रिल ते मार्चचा कालावधीस 'टॅक्स इयर' असे नाव, सध्या 'असेसमेंट इयर'अशी ओळख
  7. परदेश दौरे,परदेशातील पाल्यास शिक्षण निधी, वैद्यकीय उपचारावर 2% च टीसीएस, सध्या 5%ते 20% 
  8. इन्कम टॅक्स रिटर्न सुधारण्यास 9 ऐवजी 12 महिन्यांची मुदत, मात्र 9 व्या महिन्यानंतर फी लागणार
  9. फक्त आधार कार्डद्वारे पॅन कार्ड मिळणे बंद, जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना, शालांत प्रमाणपत्र, मॅजिस्ट्रेट मंजुरीचे प्रतिज्ञापत्रही लागणार
  10. रस्ते अपघातात मिळालेल्या भरपाईवर इन्कम टॅक्स लागणार नाही

नोकरदारांसाठी काय काय बदलणार? (New Rule From 1 April 2026)

  1. नव्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे अर्थात मूळ वेतन हे वेतनाच्या 50% राहणार
  2. बेसिक पे वाढल्यानं ईपीएफ आणि ग्रॅच्युइटी वाढणार
  3. नोकरी संपताच ग्रॅच्युइटी वगळता सारे पैसे 2 दिवसांत मिळणार, सध्या 30 ते 90 दिवसांची मुदत
  4. 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना इन्कम टॅक्स नाही.
  5. कर्मचाऱ्यांना महिन्याला 25 हजार रु. किंवा भत्त्याच्या 70 टक्क्यांपर्यंत टीए देता येणार, सध्या 10 हजार किंवा 70% मर्यादा
  6. पुणे, हैदराबाद,बंगळुरु,अहमदाबादमध्येही 50% एचआरए लागू, सध्या चार मेट्रो शहरांतच करता येत होता क्लेम
  7. कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार,बसवर 1800-2400 रु. ऐवजी 8 ते 10 हजार रु. इतका कर
  8. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या 15 हजार रुपयांपर्यंतच्या जेवणाच्या कुपनसोबत गिफ्ट कार्ड,गिफ्ट सर्टिफिकेटही करमुक्त
  9. इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी फॉर्म 16 आणि 16 ए ऐवजी फॉर्म 130 आणि 131 लागू होणार
  10. इन्कम टॅक्स रिटर्न सुधारण्यास 9 ऐवजी 12 महिन्यांची मुदत, मात्र 9 व्या महिन्यानंतर फी लागणार

रेल्वेच्या नियमात कोणते बदल? (New Rule In Railway)

  1. रेल्वेगाडी निघण्याच्या 8 तासांत तिकीट रद्द केल्यास परतावा नाही 
  2. रेल्वे तिकीट गाडी निघण्याच्या 8-24 तासांपूर्वी रद्द केल्यास 50% परतावा
  3. रेल्वे तिकीट गाडी निघण्याच्या 24-72 तासांपूर्वी रद्द केल्यास 25% कपात
  4. गाडी निघण्याच्या 72 तास आधी तिकीट रद्द केल्यास फक्त चार्जेस लागणार

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   

Continues below advertisement