New Delhi : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2020 च्या दिल्ली दंगली कट रचल्याप्रकरणी उमर खालिद (Umar Khalid) आणि शरजिल इमाम (Sharjeel Imam) यांचा जामीन अर्ज फेटाळलाय. न्यायालयाच्यायानिर्णयानंतर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) घोषणाबाजी करण्यात आली, असा दावा केला जात आहे. यामध्ये जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या एका गटाने विद्यापीठ कॅम्पसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात वादग्रस्त घोषणाबाजी केली. सोमवार, (5 जानेवारी 2026) रात्री झालेल्या निदर्शनाच्या कथित व्हिडिओनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याचेबोललंजातआहे.
अशातच, जेएनयू कॅम्पसमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याच्या वृत्तांबाबत, काँग्रेसचे नेते उदित राज म्हणाले कि, "हा राग व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. जेएनयूमध्ये (2020च्या दिल्ली दंगलीतील मोठ्या कट रचल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध) संताप आहे. त्यांच्याशी (उमर खालिद आणि शरजिल इमाम) असे केले जात आहे, कारण ते मुस्लिम आहेत. उमर खालिद आणि शरजिल इमाम यांच्याशी अन्याय्य वागणूक देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे." अशाशब्दातत्यांनीयाप्रकरणावरभाष्यकेलंय.
दुसरीकडे, JD(U) चे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद म्हणाले कि, "सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. या देशात कोणत्याही प्रकारची अराजकता सहन केली जाऊ शकत नाही. न्यायालयाचे निर्णय सर्व पक्षांना लागू होतात आणि अशा कारवाया कोणत्याही परिस्थितीत अस्वीकार्य आहेत." असेही राजीव रंजन प्रसाद म्हणाले.
Kapil Mishra : "गोष्टहीकेवळ जेएनयू बद्दलची नाहीये, तर....
दरम्यान, दिल्ली सरकारचे मंत्री कपिल मिश्रा म्हणाले, "गोष्टही जेएनयूबद्दल (JNU) नाहीये, तर असे काही लोक आहेत जे अशा देशविरोधी आणि धर्मविरोधी घोषणा देतात. ते अफझल गुरुसाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध, दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ आणि नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणा देतात, परंतु एकूणच, त्यांचे नारे फक्त घोषणांपुरते मर्यादित आहेत. जिथे नक्षलवादी होते, ते गेले आहेत; जिथे दहशतवादी होते, ते गेले आहेत. आणि दिल्लीविरुद्ध कट रचणाऱ्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे, म्हणून ही त्यांची निराशा आहे."
सोशल मीडिया साइट X वर एका पोस्टमध्ये कपिल मिश्रा म्हणाले, "सापांच्या फण्या चिरडल्या जात आहेत, साप ओरडत आहेत. जेएनयूमध्ये नक्षलवादी, दहशतवादी आणि दंगलखोरांच्या समर्थनार्थ अश्लील घोषणाबाजी करणारे निराश झाले आहेत, कारण नक्षलवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दहशतवाद्यांवर कारवाई केली जात आहे आणि न्यायालयाने दंगलखोरांना ओळखले आहे."
Manjinder Singh Sirsa : मनजिंदर सिंग सिरसा काय म्हणाले?
दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, "मी याचा तीव्र निषेध करतो. जर या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांविरुद्ध निदर्शने सुरू राहिली तर काय उरणार? या लोकांना देशाचा, संविधानाचा किंवा कायद्याचा आदर नाही. ते फुटीरतावादी आहेत. ते फक्त देश तोडण्याबद्दल बोलतात. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरुद्ध अपशब्द वापरणे लज्जास्पद आहे. आज सकाळी मी ज्येष्ठ आप नेते संजय सिंह यांचे विधान पाहत होतो. त्यांनी सांगितले की ते सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतात आणि पुढच्याच ओळीत ते म्हणतात की त्यांना तुरुंगात टाकले जाऊ नये." "याचा अर्थ असा की ज्यांनी निष्पाप लोकांना मारले, ज्यांनी हिंसाचार केला आणि दिल्ली दंगलींमध्ये लोकांची हत्या केली त्यांना तुरुंगात टाकू नये. कसा तरी, आप आणि काँग्रेस नेहमीच या कटामागे, उमर खालिद, शरजिल इमाम आणि इतरांच्या मागे असल्याचे दिसून येते."
हेहिवाचा
