नवी दिल्ली : नीट यूजी (NEET-UG) पुनर्परीक्षेपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना दिशाभूल करणारी माहिती पसरवणारे नेटवर्क शोधून ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केंद्रीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेचे सुरक्षित, पारदर्शक आणि निष्पक्ष आयोजन सुनिश्चित करण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीला शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि (NTA) चे महासंचालक उपस्थित होते. संभाव्य त्रुटी आधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मेटा , गुगल आणि टेलिग्राम च्या प्रतिनिधींसोबत झालेल्या स्वतंत्र बैठकीत स्पर्धा परीक्षांबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.

विशेषतः टेलिग्राम चॅनेल्स आणि अनामिक ऑनलाइन गटांमधून फेक पेपर लीक दावे, क्लिकबेट कंटेंट आणि अप्रमाणित माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली जात असल्याचे निदर्शनास आले. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, काही संशयास्पद चॅनेल्स मर्यादित फोन नंबरद्वारे चालवले जात असून यामागे संघटित नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय आहे.

याची गंभीर दखल घेत धर्मेंद्र प्रधान यांनी अशा नेटवर्कवर तातडीने कारवाई, फेक माहिती पसरवणाऱ्या चॅनेल्सची ओळख, ब्लॉकिंग आणि टेकेडाउन करण्याचे आदेश दिले.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी शिक्षण मंत्रालय, NTA आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांसोबत समन्वय साधून दिशाभूल रोखावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना अफवांपासून सुरक्षित ठेवणे आणि परीक्षा प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राखणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

नीट यूजी पुनर्परीक्षा परीक्षा 21 जूनला

नीट यूजी फेरपरीक्षा आता 21 जूनला आयोजित केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली होती. 3  मे रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर सीबीआयकडून देशभरात काही राज्यात छापे टाकण्यात आले. एनटीएमध्ये फेरबदल करण्यात आले. नीट यूजी परीक्षेतील काही प्रश्न फुटल्याचं समोर आल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क देखील परत केलं जाणार आहे.फेरपरीक्षेचं शुल्क विद्यार्थ्यांना भरावं लागणार नाही.  नीट पेपरफुटी प्रकरणी पी.व्ही. कुलकर्णी, मनिषा मांढरे आणि शिवराज मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आहे. नीट यूजी परीक्षेत गैरप्रकार करणारे नाशिक, लातूर, पुणे इथले असून काही जणांना राजस्थानातदेखील अटक झालीय. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI