NEET UG 2026 Re-Exam: पेपरफुटी प्रकरणानंतर जाहीर झालेल्या नीट (NEET) फेरपरीक्षेसाठी (Re-Exam) विद्यार्थ्यांना १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही माहिती दिली आहे. आता परिक्षेचा सुधारित वेळ दुपारी २:०० ते ५:१५ या वेळेत (एकूण १९५ मिनिटे) होणार आहे. तर प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आणि शेवटी मिळून रफ कामासाठी (Rough Work) पानांची संख्या २ वरून थेट ४ करण्यात आली आहे. ही फेरपरीक्षा २१ जून रोजी घेतली जाणार आहे. नीटचा पेपर सोडवण्यासाठी अधिकची पंधरा मिनिटे मिळणार आहेत, 21 जूनच्या परीक्षेपूर्वी एनटीएने हा मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांऐवजी 195 मिनिटांचा असणार आहे, परीक्षेसाठी दुपारी दोन ते सव्वा पाच पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. रफ कामांसाठी प्रश्नपत्रिका मध्ये अतिरिक्त जागा दिली जाईल अशी माहिती आहे. 

Continues below advertisement

21 जून रोजी एनटीएकडून नीटची परीक्षा घेतली जाणार आहे. ही फेरपरीक्षा आहे. पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना यापूर्वीच शारीरिक मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे जी आगामी परीक्षा 21 जून रोजी होणार आहे, त्या परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पंधरा मिनिटं जास्तीचे मिळणार आहेत अशी माहिती एनटीएकडून दिली गेली आहे, अपवादात्मक परिस्थितीत होत असलेली ही परीक्षा आहे, त्यामुळे यामध्ये वेळ वाढवून देण्यात आला आहे, शिवाय रफवर्क करण्याशिवाय अतिरिक्त जागा प्रश्नपत्रिका मध्ये देण्यात आली आहे.

NEET Re-Exam Update:  पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला

 पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार (NEET UG 2026 Re-Exam Schedule) आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी एनटीएकडून घोषणा करण्यात आली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली होती. (NEET Re-Exam On 21 June 2026)

Continues below advertisement

पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली नीटच्या पुर्नरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. एनटीएकडून 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने पुढील प्रवेशांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. वर्षभर तयारी करुन परीक्षा दिल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप निर्माण झाला होता. (NEET UG 2026 Re-Exam Date)

नीटची परीक्षा रद्द का झाली? (why neet exam 2026 cancle?)

  1. राजस्थानातील सीकरमध्ये नीट परीक्षेपूर्वी 'गेस पेपर'चे वितरण
  2. 'गेस पेपर'मध्ये एकूण 410 प्रश्न होते
  3. 'गेस पेपर'मधील 120 ते 135 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे
  4. नीटच्या परीक्षेशी जुळलेले बहुतांश प्रश्न रसायनशास्त्र विषयाचे
  5. प्रश्नांतील साधर्म्य हा अचूक अंदाज की पेपरफुटी याची चौकशी झाली
  6. प्राथमिक चौकशीतील बाबी पाहून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

नीटच्या परिक्षेबाबत विविध प्रश्नांची उत्तर- (NEET UG 2026 Re-Exam)

1. NEET UG Registration : पुन्हा अर्ज करावा लागणार का?

नाही. विद्यार्थ्यांना नव्याने Registration करण्याची आवश्यकता नाही. NTA कडे आधीपासून उपलब्ध असलेला डेटा पुढील प्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे.

2. NEET UG Exam Fee : पुन्हा फी भरावी लागणार का?

नाही. विद्यार्थ्यांनी आधी भरलेली परीक्षा फी वैध राहील. अतिरिक्त फी भरण्याची गरज नाही.

3. NEET Fee Refund : आधी भरलेली फी परत मिळणार का?

होय. NTA ने स्पष्ट केले आहे की आधी भरलेली परीक्षा फी नियमांनुसार विद्यार्थ्यांना परत केली जाईल आणि पुनर्परीक्षा NTA स्वतःच्या संसाधनांतून आयोजित करेल.

4. NEET Admit Card : नवीन Admit Card जारी होणार का?

होय. नवीन परीक्षेच्या वेळापत्रकानुसार NTA पुन्हा Admit Card जारी करेल. विद्यार्थ्यांना ते अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतील. त्याची पूर्वसूचना देण्यात येईल.

5. NEET Exam Centre Choice : पुन्हा परीक्षा केंद्र निवडावे लागेल का?

नाही. विद्यार्थ्यांनी आधी निवडलेले केंद्रांचे पर्याय NTA च्या नोंदीत कायम राहतील.

6. NEET Exam Centre Allocation : तेच परीक्षा केंद्र मिळेल का?

याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. परिस्थितीनुसार NTA केंद्रांमध्ये बदल करू शकते.

7. NEET New Exam Date : NEET ची नवीन तारीख कधी जाहीर होणार?

सध्या नवीन परीक्षा तारीख जाहीर झालेली नाही. NTA लवकरच सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे.

8. NEET Official Schedule : वेळापत्रक कुठे पाहता येईल?

परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक आणि सर्व अपडेट्स NTA Official Website वर उपलब्ध होतील.

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI