Naxal Encounter : बालाघाटमध्ये पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक; चार नक्षलवादी ठार, तीन महिलांचा समावेश
Naxal Encounter : मध्यप्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्यात नक्षल निर्मूलनासाठी तैनात असलेल्या जवानांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे.

Naxal Encounter : मध्यप्रदेश राज्यातील नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणांना शनिवारी मोठे यश मिळाले आहे. रूपझर पोलीस ठाण्याच्या बिथली पोलीस चौकीच्या हद्दीत असलेल्या पचामा दादर भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. त्यामध्ये तीन महिला नक्षलवादी आणि एक पुरुष नक्षलवादी यांचा समावेश आहे.
ही चकमक शनिवारी दुपारी सुरू झाली होती आणि रात्रीपर्यंत ही चकमक सुरू राहिली. सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहीम देखील राबविण्यात आली. यामध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडून हँड ग्रेनेड, एसएलआर (सेल्फ लोडिंग रायफल), आणि इतर महत्त्वाचे शस्त्रास्त्र तसेच दैनंदिन वापरातील वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई हॉक फोर्स आणि मध्यप्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने राबवली. ही मोहीम नक्षल निर्मूलनासाठी राबवण्यात आलेल्या नियोजनाचा एक भाग होती. बालाघाट जिल्हा गेल्या काही काळापासून नक्षल चळवळीच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत पोलीस आणि हॉक फोर्स यांच्या संयुक्त कारवाईला मोठे यश मिळाले आहे. याबाबत बालाघाट जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार करण्यात आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी म्हटले आहे की, नक्षलवाद्यांमध्ये तीन महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. त्यांच्याकडून अनेक शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईसाठी राज्य सरकार पोलिसांना निश्चितच बक्षीस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी एवं केंद्रीय गृह मंत्री श्री @AmitShah जी के मार्गदर्शन में मार्च 2026 तक नक्सलवाद को समूल नष्ट करने के अभियान में प्रदेश ने एक बड़ी सफलता प्राप्त की है।
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) June 14, 2025
एक पुरुष व तीन महिला सशस्त्र नक्सलियों को पचामादादर एवं कटेझिरिया के जंगल में…
फेब्रुवारीत चार महिला नक्षलवादी ठार
दरम्यान, याआधी 19 फेब्रुवारी 2025 रोजी बालाघाट पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. कान्हा येथील सूपखार वनक्षेत्रातील रौंडा फॉरेस्ट कॅम्पजवळ झालेल्या चकमकीत चार महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या नक्षलवाद्यांमध्ये आशा, शीला, रंजिता आणि लख्खे मरावी यांचा समावेश होता. या चौघींवर एकूण 62 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्या 2015-16 सालापासून नक्षल चळवळीत सक्रिय होत्या.
आणखी वाचा
























