Chemist Strike : देशभरात आज अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा बंद (Drug Dealers Strike) पुकारण्यात आलेला असून या अनुषंगाने राज्यातील एक लाख 25 हजार तर देशातील साडेबारा लाख औषध विक्रेते (Chemist Strike) हे सहभागी होणार आहेत. यामुळे मात्र सर्वसामान्य व अत्यावश्यक रुग्णांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशभरात होत असलेल्या ऑनलाइन औषध विक्रीवर सरकारने बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी हा औषध विक्रेत्यांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. ऑनलाइन औषध विक्रीमुळे (Online Pharmacy) अनेक आरोग्यविषयक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचा दावा औषध विक्रेते संघटनेने केला आहे.
Chemist Strike for Online Pharmacy: बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री, देशभरात बंदची घोषणा
ऑनलाईन अॅप्सवरून होणाऱ्या औषध विक्रीविरोधात आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याचा आरोप करत साडेबारा लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि वितरक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने देशभरात बंदची घोषणा केली आहे. ऑनलाइन अॅप्सवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे. यामुळे छोट्या केमिस्ट दुकानदारांना आर्थिक फटका बसत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.कोविड काळात दिलेल्या सवलतीचा ऑनलाइन कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही केला जातोय. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन देण्यात आलं होतं, मात्र केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं संघटनेने म्हटलं आहे.
केंद्र सरकारने कोरोना काळात विशेष अधिकार वापरून ऑनलाइन औषधांची विक्री करण्याची परवानगी दिली होती . मात्र अद्यापही हा कायदा अस्तित्वात असल्याने सर्रास ऑनलाइन औषधी विकल्या जात आहे व त्यामुळे शारीरिक वैद्यकीय व सामाजिक दुष्परिणाम यातून समोर येत असल्याचा दावा औषध विक्रेत्या संघटनेचा आहे.
औषध विक्रेत्यांच्या दाव्यानुसार नेमके ऑनलाईन औषधीमुळे काय काय दुष्परिणाम?
-ऑनलाइन औषध विक्रीत कुठलंही डिजिटल रजिस्टर मेंटेन केल्या जात नाही.
-ऑनलाइन ऑर्डर दिल्याने नशेच्या गोळ्या,गर्भपाताच्या गोळ्या, शक्तीवर्धक गोळ्या या सहज उपलब्ध होत आहेत. ज्याचा सामाजिक दुष्परिणाम जाणवत आहे.
-ऑनलाइन प्रिस्क्रिप्शन मुळे डॉक्टर बनावट आहे की पदवीधर याची ओळख पटत नाही.
-ऑनलाइन औषध विक्रीमुळे देशात बनावट औषध विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे.
-ऑनलाइन औषध विक्री ही ट्रक अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये बसत नाही.
आज राज्यासह देशभरातील औषधी दुकाने बंद राहणार असल्याने याचा फटका मात्र सामान्य व आपत्कालीन रुग्णांना बसणार आहे यासाठी संघटनेने कुठलीही तजवीज केलेली नसून हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल असा दावाही संघटनेने केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
