नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ फेसबुकवरुन हटवल्या प्रकरणी संसदीय समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीला सोशल मीडिया कंपनी मेटाचे अधिकाही देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर कम्युनिकेशन अँड आयटी यासंदर्भातील संसदीय समितीचे चेअरमन भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवण्याच्या प्रकरणात मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितली पाहिजे, अशी भूमिका घेतली.  

Continues below advertisement

संसदीय समितीच्या बैठकीत फेसबुकची पेरेंट कंपनी मेटानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवण्याच्या प्रकरणात माफी मागितली.  हा व्हिडिओ तांत्रिक कारणांमुळं चुकून डिलीट झाल्याचं सांगितलं. या बैठकीत काही सदस्यांनी हे प्रकरण फक्त माफी मागून संपण्यासारखं नाहीये, याप्रकरणात जबाबदारी निश्चित होण्याची गरज असल्याचं म्हटलं. 

निशिकांत दुबे काय म्हणाले?

कम्युनिकेशन आणि आयटी या विषयावरील संसदीय समितीचे अध्यक्ष भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं की प्रश्न हा आहे की मेटा इंडियानं पंतप्रधानांचा कंटेंट हटवला, हे पहिल्यांदा घडलं नाही की मेटा इंडियानं असं केलं आहे.  तुम्हाला आठवत असेल की मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी जानेवारी महिन्यात 2024 च्या निवडणुकांबाबत वक्तव्य केलं होतं, त्यानंतर माफी मागितली होती. यातून त्यांचा हेतू देशाला अस्थिर करण्याचं असल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला.  

Continues below advertisement

निशिकांत दुबे म्हणाले की , ‘भारताच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ हटवला जातो, मेटाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं की रात्री 12.30 वाजल्यापासून पहाटे 5:00 वाजेपर्यंत व्हिडिओ गायब होता. त्यामुळं हे प्रकरण गंभीर आहे. आमच्या समितीनं दोन वेळा स्पष्ट केलंकी माफी मार्क झुकरबर्ग यांच्याकडून आली पाहिजे. झुकरबर्ग यांनी तसं केलं नाही तर त्यांना सेक्शन 79 नुसार मिळणारी सेफ हार्बर सुरक्षा मागं घेतली जावी.